26 September 2020

News Flash

मुंबई कोर्टाची अरविंद केजरीवालना क्लीन चीट

केजरीवाल, मेधा पाटकर तसेच मीरा सन्याल यांनी पोलिसांची परवानगी न घेता प्रचारसभा काढल्याचा ठपका होता

अरविंद केजरीवाल मुंबईत, एक्स्प्रेस फोटो- निर्मल हरिंद्रन

मुंबईतील कोर्टानं आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची 2014 च्या निवडणुकांमधील प्रचारसभेच्या प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. या निवडणुकांच्यावेळी केजरीवाल, मेधा पाटकर तसेच मीरा सन्याल यांनी पोलिसांची परवानगी न घेता प्रचारसभा काढल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

महाराष्ट्र पोलिस अॅक्टअंतर्गत प्रचार सभा घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक आहे. ही परवानगी 2014 मध्ये लोकसभेचा प्रचार करताना या तिघांनी घेतली नव्हती असा आरोप होता. परंतु पोलिसांनी तिन्ही आरोपींना प्रचार सभेची परवानगी नाकारत आहोत, असे पत्र दिले नसल्याचे शुक्रवारी कोर्टानं निदर्शनास आणले. न्यायदंडाधिकारी पी. के. देशपांडे यांनी केजरीवालांची या मुद्यावरून मुक्तता केली आहे.

आपच्या तिकिटावर मीरा सन्याल व मेधा पाटकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी मानखुर्दमध्ये सभा घेतली होती. ही सभा नियोजित नव्हती आणि तिच्यासाठी आवश्यक ती परवानगीही घेण्यात आली नव्हती असा दावा पोलिसांनी केला होता. केजरीवाल व मीरा सन्याल आज न्यायालयात उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 5:06 pm

Web Title: mumbai court acquits arvind kejriwal
Next Stories
1 मोबाइल सोडा, आधी छोट्या पिनचा चार्जर बनवून दाखवा, चौहान यांचा राहुल गांधींना टोला
2 Sabarimala Temple Verdict: हे तर पुरूषप्रधान संस्कृती बदलण्यासाठी…
3 ९७ वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी स्थापन केलेली शाळा पडली बंद
Just Now!
X