21 September 2020

News Flash

गुंगीचे औषध देऊन राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले

गुंगीचं औषध दिल्याची प्रवाशांची माहिती

संग्रहित छायाचित्र.

मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशांकडील दहा ते पंधरा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. राजस्थानमधील कोटा येथे काल मध्यरात्री ही घटना घडली. एक्स्प्रेसच्या एसी-२ टायर आणि एसी-३ टायर अशा नऊ डब्यांमधील प्रवाशांकडील ऐवज चोरीला गेला आहे. याआधीही धावत्या एक्स्प्रेसमध्ये चोरीच्या घटना घडल्याचं प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत ११ प्रवाशांनी एफआयआर दाखल केला आहे. पदार्थांमधून गुंगीचे औषध दिल्यानंतर झोप लागली. संधी साधून चोरट्यांनी बॅगांमधील रोकड आणि दागिने चोरून पोबारा केल्याचं काही प्रवाशांनी तक्रारीत म्हटलं आहे. काही प्रवाशांची पाकीटं आणि पर्स एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात सापडली, अशी माहितीही त्यांनी दिली. याआधीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी एक्स्प्रेसमधील डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळं घटनांचं प्रमाण कमी झालं आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 6:07 pm

Web Title: mumbai nizamuddin rajdhani express passengers robbed near kota in rajasthan
Next Stories
1 प्रसिद्ध गायक यश वडाली विरोधात विनयभंगाचा गुन्हा
2 काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घ्या!; विरोधकांचे संसदेत आंदोलन
3 पहिल्यांदा संभाषण करताना ‘हे’ लक्षात ठेवा…(भाग २)
Just Now!
X