07 March 2021

News Flash

कमला मिल आगप्रकरणातील आरोपींना पकडून देणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस जाहीर

आठवडाभरानंतरही आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश

कमला मिल कंपाऊंडमधील आगीचे संग्रहित छायाचित्र

मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १४ निष्पापांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या तीन आरोपींना पकडून देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांकडून १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मुंबई पोलिसांनी या आरोपींचे फोटो प्रसिद्ध करीत हे आवाहन केले आहे. २८ डिसेंबरच्या रात्री ही दुर्घटना घडून गेल्यानंतर आठ दिवसांनंतरही आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांना अद्याप पकडू शकलेले नाहीत.

वन अबव्ह बारचे तीन आरोपी संचालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटना घडल्यापासून तिघेही आरोपी फरार झाले आहेत. कारवाई टाळण्यासाठी त्यांनी देशाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांकडून त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 9:37 pm

Web Title: mumbai police announces a reward of rs 1 lakh for the person who gives information about the three accused in kamala mills fire incident
Next Stories
1 भीमा कोरेगाव प्रकरण : औरंगाबादेतील हिंसाचाराच्या तपासासाठी पोलीसांची समिती स्थापन
2 २०१७-१८ तील जीडीपीच्या दरात घटीचा अंदाज; मोदी सरकारसाठी मोठा झटका ?
3 तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत अडकले; सरकारकडे उरलेत मोजकेच पर्याय
Just Now!
X