इस्लामिक धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक, फारुख देवडीवाला यांचा ताबा मिळवण्यात भारतीय तपास यंत्रणा अपयशी ठरल्या. आता मुदस्सर हुसैन सय्यद ऊर्फ मुन्ना झिंगाडा यांचा ताबा मिळवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानी तपास यंत्रणांमध्ये थायलंडमध्ये कायदेशीर लढाई सुरु आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर गोळया चालवणाऱ्या मुन्ना झिंगाडाची तिथे शिक्षा भोगून पूर्ण झाली आहे.

२००१ साली छोटा राजनवर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी त्याला थायलंडमध्ये तुरुंगवास झाला होता. मुन्ना झिंगाडा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसांपैकी एक आहे. फरार असलेला मुन्ना झिंगाडा भारतीय नागरीक आहे हे सिद्ध करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी अनेकदा थायलंडला जाऊन आले आहेत. झिंगाडाच्या प्रत्यार्पणासंबंधी थायलंड कोर्टात सुरु असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे.

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
Pakistani flight attendants
पाकिस्तानी एअर होस्टेस अचानक देश का सोडतायत? कॅनडामध्ये आश्रय घेण्याची कारणे काय?
police commissioner nagpur
चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तानी तपास यंत्रणांचा मुन्ना झिंगाडा आपला नागरीक असल्याचा दावा आहे. मागच्या दोनवर्षांपासून झिंगाडाचे नागरीकत्व ठरवण्यावरुन थायलंडच्या कोर्टात खटला सुरु आहे. मुंबईत जोगेश्वरी येथे राहणाऱ्या झिंगाडावर भारतात ७० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. झिंगाडा भारताच्या ताब्यात गेला तर दाऊद आणि आयएसआयच्या संबंधांबद्दल अधिक माहिती भारताच्या हाती लागेल याची भिती पाकिस्तानला आहे. म्हणून ते झिंगाडासाठी इतका खटाटोप करत आहेत.

भारताला नुकताच यूएईच्या सरकारने झटका दिला. भारताचा दावा अमान्य करुन यूएईने देवडीवालाला पाकिस्तानच्या ताब्यात दिले. देवडीवाला हा छोटा शकीलचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तो शारजामध्ये लपून बसला होता. तो इंडियन मुजाहिद्दीनसाठीही काम करायचा. मे महिन्यात त्याला यूएईतील तपास यंत्रणांनी अटक केली होती. भारताने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी व्हावी, यासाठी इंटरपोलकडे पाठपुरावा केला होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा प्रयत्नशील होत्या. दोन भारतीयांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिल्याप्रकरणात देवडीवाला आरोपी आहे.