विवाहानंतर धर्मातर करण्यास नकार देणाऱ्या एका २३ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचे गुरुवारी समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती आणि अन्य एकाला अटक केली आहे. प्रीतनगरजवळच्या जंगलात सोमवारी या महिलेचा मृतदेह मिळाला.  प्रिया सोनी असे या महिलेचे नाव आहे. प्रिया हिने कुटुंबाचा विरोध असताना दीड महिन्यापूर्वी एजाज नावाच्या व्यक्तीशी विवाह केला होता.