पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावरील बेनझीर भुट्टो यांच्या हत्या प्रकरणातील खटल्याचे कामकाज मंगळवारपासून सुरू झाले आह़े  रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयात प्रकरणातील साक्षीदारांचे साक्ष नोंदविण्याचे काम सुरू झाल्याचे सरकारी वकील अझीझ चौधरी यांनी सांगितल़े
या प्रकरणात चार साक्षीदारांना बोलाविण्यात आले होत़े, परंतु त्यापैकी केवळ एकाचीच तपासणी करण्यात आली़  या खटल्याचे कामकाज किती दिवस चालेल ते सांगता येणार नाही, असेही अझीझ म्हणाल़े  सुरक्षेच्या कारणास्तव मुशर्रफ यांचा न्यायालयात न उपस्थित राहण्याची सवलत देण्यात आली आह़े  त्यामुळे मंगळवारी ते न्यायालयात उपस्थित नव्हत़े