07 March 2021

News Flash

‘जगात २०३५ पर्यंत सर्वाधिक मुस्लिम मुले जन्माला येतील’

२०५० पर्यंत भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश

प्रातिनिधीक छायाचित्र

पुढील २० वर्षानंतर मुस्लिम महिला मुलांना जन्म देण्याच्या बाबतीत ख्रिस्ती महिलांना मागे टाकतील, असा दावा प्यू रिचर्स सेंटरने केला आहे. सध्याच्या घडीला ख्रिस्ती धर्मीय महिला सर्वाधिक मुलांना जन्म देतात. मात्र २०३५ मध्ये या आकडेवारीत बदल होईल, असे प्यू रिचर्स सेंटरने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. प्यू रिचर्स सेंटरकडून लोकसंख्येचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून अभ्यास केला जातो.

‘पुढील २० वर्षांपेक्षा कमी कालावधीत मुस्लिम महिलांकडून जन्म देण्यात आलेल्या मुलांची संख्या ख्रिस्ती धर्मीय महिलांकडून जन्म देण्यात आलेल्या मुलांपेक्षा जास्त असेल,’ असे प्यू रिसर्च सेंटरने म्हटले आहे. प्यू रिसर्च सेंटरने यामागील कारणेदेखील स्पष्ट केली आहेत. मागील काही वर्षांमध्ये ख्रिस्ती धर्मियांमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढणार आहे. कारण ख्रिस्ती समाजात वृद्धांची संख्या सर्वाधिक आहे.

मुस्लिम धर्मीयांमध्ये सध्याच्या घडीला तरुणांची संख्या सर्वाधिक आहे आणि मुस्लिम महिलांचा प्रजनन दरदेखील जास्त आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या संशोधनानुसार, तरुणांची मोठी संख्या आणि महिलांमधील प्रजननाचा दर यामुळे २०३० ते २०१३५ दरम्यान २२५ अब्ज मुस्लिम मुले जन्माला येतील, तर याच काळात ख्रिस्ती धर्माची २२४ अब्ज मुले जन्म घेतील. मात्र तरीही या काळात जगातील एकूण लोकसंख्येचा विचार केल्सास ख्रिस्ती धर्मच आघाडीवर असेल. २०५५ ते २०६० या कालावधीत मुस्लिम मुलांची संख्या ख्रिस्ती मुलांच्या तुलनेत ६० लाखांनी अधिक असेल.

२०५० साली जगातील मुस्लिमांची संख्या ख्रिस्ती धर्मियांइतकी असेल, असा अंदाज प्यू रिसर्च सेंटरने दोन वर्षांपूर्वीच व्यक्त केला होता. २०५० पर्यंत मुस्लिमांची संख्या २.८ बिलियन इतकी असेल, तर याच वर्षी ख्रिस्ती धर्मियांची संख्या २.९ बिलियन इतकी असेल, असे अंदाज प्यू रिसर्च सेंटरने अहवालात म्हटले होते. २०५० पर्यंत भारतात मुस्लिमांच्या लोकसंख्येत भारत पहिल्या क्रमांकावर असेल, तर दुसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया असेल, असेही प्यू रिसर्च सेंटरने म्हटले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 6:38 pm

Web Title: muslim babies will outnumber christian babies after 2035
Next Stories
1 रवींद्र गायकवाड प्रकरणी तोडगा काढा; अन्यथा एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार: शिवसेना
2 मोदींचा विरोध करणाऱ्यांना या देशात स्थानच उरले नाही – राहुल गांधी
3 मृतदेह जाळावा की पुरावा?; सीबीएसईच्या जीवशास्त्राच्या परीक्षेतील अजब प्रश्न
Just Now!
X