पदच्युत अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांना पुन्हा सत्तास्थानी बसवण्याच्या मागणीसाठी मोर्सीसमर्थक मुस्लिम ब्रदरहूडने इजिप्तमध्ये सुरू केलेल्या हिंसाचाराने आता उग्र रुप धारण केले आहे. मोर्सीसमर्थक विरूद्ध लष्कर यांच्यातील संघर्षांत गेल्या चार दिवसांत ८०० जणांचा बळी गेला आहे. या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर हंगामी पंतप्रधान हाझम बेबलावी यांनी ब्रदरहूडवर बंदी घालण्याचे सूतोवाच केले आहे.
गेल्या चार दिवसांपासून इजिप्त हिंसाचारामध्ये होरपळतो आहे. मोर्सीसमर्थक मुस्लिम ब्रदरहूडने पुकारलेल्या या आंदोलनाने आता उग्र हिंसाचाराचे रुप धारण केले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ८०० जणांचा बळी गेला आहे. या पाश्र्वभूमीवर बेबलावी यांनी ब्रदरहूडवर बंदीची कुऱ्हाड उगारण्याचे संकेत दिले आहेत. ‘ब्रदरहूडशी आता चर्चा नाही. ज्यांचे हात इजिप्तच्या निष्पाप नागरिकांच्या रक्ताने माखले आहेत त्यांच्याशी चर्चा करणे तर दूरच उलटपक्षी अशा संघटनांवर बंदी हाच सर्वोत्तम उपाय आहे’, अशा शब्दांत पंतप्रधान बेबलावी यांनी ब्रदरहूडवर कारवाईचे संकेत दिले. ब्रदरहूडला बंदीची सवयच आहे. या संघटनेवर १९५४ पासून बंदी होती. तेव्हा तिने भूमिगत होऊन इजिप्तमधील राजकारण चालवले. आताही बंदी आल्यास ही संघटना अशासकीय संस्था म्हणून दुसऱ्याच नावाने कार्यरत राहील असे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, देशात हिंसाचाराबाबत बघ्याची भूमिका आम्ही घेऊ शकत नाही असे स्पष्ट करत लष्करप्रमुख सिसी यांनी हिंसाचार कर्त्यांविरोधात कठोर कारवाइचे संकेत दिले.

हिंसाचार सुरूच
गेल्या चार दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या इजिप्तमध्ये आतापर्यंत ८०० जणांचा बळी गेला आहे. देशातील हा वाढता हिंसाचार मोडून काढण्याचा निर्धार तेथील लष्कराने केला आहे. तसेच हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या मुस्लीम ब्रदरहुडवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे सूतोवाच हंगामी सरकारने केले आहे. दरम्यान, ‘अँटी कूप कोअ‍ॅलिशन’ या संघटनेतर्फे रविवारी कैरोसह देशभरात आयोजित केलेले मोर्चे रद्द करण्यात आले.
अग्रलेख : ओसामाचे भूत