करोना व्हायरसच्या या संकटकाळात देशाच्या वेगवेगळया भागांमध्ये हिंदू-मुस्लिमांनी परस्परांना मदत केल्याची अनेक उदहारणं आपण पाहिली आहेत. आता पंजाबच्या लुधियानामधुन माणुसकी धर्मावरचा विश्वास बळकट करणारी एक घटना समोर आली आहे. लुधियानामध्ये राहणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबाने हिंदू जोडप्याचे लग्न लावून दिले.

भातियनमध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय पूजाचे साहनेवाल गावत राहणाऱ्या सुदेश कुमार बरोबर हिंदू रितीरिवाजानुसार लग्न लावण्यात आले. लॉकडाउनमुळे पूजाच्या आई-वडिलांना उत्तर प्रदेशहून परतणे शक्य झाले नाही. त्यामुळे या मुस्लिम जोडप्यानेच तिचे कन्यादान केले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

Gujarat Freedom of Religion Act
हिंदू अन् बौद्ध धर्म वेगळा, आता धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार; गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा काय सांगतो?
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
vladimir putin
“इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून मॉस्कोत दहशतवादी हल्ला”, पुतिन यांचं वक्तव्य; युक्रेनचा उल्लेख करत म्हणाले…
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!

लॉकडाउन आधीच पूजाचे लग्न निश्चित झाले होते. तिचे आई-वडील, भाऊ, बहिण हे उत्तर प्रदेशातील मोरादाबादमधील त्यांच्या गावी गेले होते. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर झाले. त्यामुळे ते तिथेच अडकले होते.
“वधूवराच्या कुटुंबाने आम्हाला लग्न लावून देणार का ? म्हणून विचारणा केली. मी पूजाच्या वडिलांना फोन केला. त्यांनी आम्हाला लग्न लावून देण्यासाठी संमती दिली. हिंदू रिवाजानुसार लग्न लावून देण्याची आम्ही सर्व तयारी केली. मी आणि माझी पत्नी सोनीने पूजाचे कन्यादान केले” असे अब्दुल साजिद यांनी सांगितले. या मुस्लिम कुटुंबाने लग्नामध्ये भेटवस्तू म्हणून पूजाला डबलबेड, भांडी आणि कपाट दिले.