फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत टीकेचा भारताने निषेध केला होता. तसंच मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल, जी भूमिका घेतली आहे त्यावरुन त्यांचा अनेकांकडून विरोधही करण्यात येत आहे. मॅक्रॉन यांच्या भूमिकेनंतर जगभरातील मुस्लिमांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केलं. बागलादेशपासून तुर्कस्थानपर्यंत सर्वत्र त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. भारतातही काही ठिकाणी मॅक्रॉन यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, मध्यप्रदेशातील भोपाळमधील एक व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये अनेक मुस्लिम नागरिक मॅक्रॉन यांच्याविरोधात आंदोलन करताना दिसत आहे. भाजपा नेते संबित पात्रा यांनी यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला असून ते भयावह असल्याचं म्हटलं आहे.

संबित पात्रा यांनी व्हिडीओ शेअर केल्यानंतर युझर्सनं त्यांच्या ट्रोल केलं. एका व्यक्तीनं ट्वीट करत मध्यप्रदेशात तर तुमचंच सरकार असल्याचं म्हटलं. तर आणखी एका व्यक्तीनं ट्विट करत त्या ठिकाणी तुमचंच सरकार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं एकत्र जमली असताना पोलीस कुठे होते, असा सवालही केला.

आणखी वाचा- या लढ्यामध्ये भारत फ्रान्ससोबत; पंतप्रधान मोदींनी दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध

आणखी वाचा- “फ्रेंच लोकांना ठार करण्याचा मुस्लिमांना अधिकार”; माजी पंतप्रधानांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर फ्रान्स म्हणालं…

का मॅक्रॉन यांच्या वक्तव्यावर होतोय वाद?

फ्रान्स युरोपमधील असा देश आहे ज्या ठिकाणी एकूण लोकसंख्येच्या १० टक्के मुस्लीम आहेत. त्यापैकी सर्वाधिक हे अन्य देशांमधून त्या ठिकाणी स्थायिक झालेले किंवा फ्रान्सच्या वसाहतींमधून येऊन त्या ठिकाणी स्थायिक झालेले नागरिक आहेत. सीरिया आणि इरामध्ये इसिसच्या वाढीनंतर फ्रान्स हा दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर आहे. तसंच दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी इस्लामी दहशतवाद आणि कट्टरतावाद्यांविरोधात लढा देणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये पैगंबर मोहम्मद यांच्या वादग्रस्त चित्रानंतर एका शिक्षकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मॅक्रॉन यांनी कट्टरतावाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर फ्रान्समध्ये अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आणि काही एनजीओदेखील बंद करण्यात आलं. त्यानंतर मॅक्रॉन यांच्याविरोधात जगभरातून आंदोलन करण्यात आलं. भारतानंही मॅक्रॉन यांच्यावरील वैयक्तीक हल्ल्याचा निषेध केला आहे.