मुस्लीम मुलांनी इसिस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांच्या प्रभावाखाली येऊ नये यासाठी केरळमधील मुस्लिमांनी या संघटनांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे.

केरळमधील दोन युवक सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून संयुक्त अरब अमिरातीमधील इसिस या दहशतवादी संघटनेच्या विचारांचा प्रसार करत असल्याचे उघड झाले होते. यानंतर ही मोहीम राबविण्यात आली. केरळ नादव्हाथुल मुजाहिद्दीन या संस्थेने दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली आहे. या संघटनेचे अध्यक्ष अब्दुल माजिद स्वालाही म्हणाले की, आमचा लढा मूलतत्त्ववाद आणि दहशतवादी विचारसरणीला विरोध करण्यासाठी आहे. दहशतवादी विचारसरणीपासून तरुणांना परावृत्त करण्याचाही आमचा प्रयत्न आहे.
ते म्हणाले की, मोहम्मद पैगंबर आणि इस्लामच्या इतिहासाला विकृत करण्याचा दहशतवादी संघटनांचा प्रयत्न आहे. तरुणांना दहशतवादापासून परावृत्त करण्याचाच आम्ही प्रयत्न करत आहोत.