17 December 2017

News Flash

मंदिर वही बनायेंगे! ट्रकभर विटा घेऊन मुस्लिम कारसेवक अयोध्येत

भारतातील मुसलमान आता जागा झाला आहे, असे ते म्हणाले.

नवी दिल्ली | Updated: April 21, 2017 12:55 PM

Muslim Kar Sevek: 'राम मंदिर त्या जागीच बनावे, अशी आमची इच्छा आहे. राम मंदिरच्या निर्मितीमुळे देशाची प्रगती होईल. हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील वैरत्व संपुष्टात येईल,' असे अयोध्येत आलेल्या मुस्लिम कारसेवक मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष आझम खान यांनी म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बाबरी मशीद व राम मंदिरचा विषय गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचदरम्यान राम मंदिराच्या निर्मितीसाठी मुस्लिम कारसेवकही सरसावल्याचे दिसत आहे. गुरूवारी सांयकाळी मुस्लिम कारसेवकांचा एक गट अयोध्येत आला असून त्यांनी येताना एक ट्रकभर विटा आणल्या आहेत. सुमारे ५० मुस्लिम कारसेवकांचा एक गट रामललाचे दर्शन करण्यासाठी पोहोचला. तत्पूर्वी त्यांनी संपूर्ण शहरात ट्रक फिरवून ‘जय श्री राम’ आणि ‘मंदिर वही बनाएंगे’च्या घोषणा दिल्या. राम मंदिर त्याच ठिकाणी झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी मात्र, या कारसेवकांना वादग्रस्त ठिकाणी जाऊ दिले नाही. पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा परत पाठवले.

 

‘राम मंदिर त्या जागीच बनावे, अशी आमची इच्छा आहे. राम मंदिरच्या निर्मितीमुळे देशाची प्रगती होईल. हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील वैरत्व संपुष्टात येईल,’ असे अयोध्येत आलेल्या मुस्लिम कारसेवक मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष आझम खान यांनी म्हटले. ‘भारतातील मुसलमान आता जागा झाला आहे. त्यांना समाजातील ठराविक दलालांनी मुर्ख बनवले आहे. आता भारतातील मुसलमान मंदिर निर्मितीच्या बाजूने उतरला असून मंदिर तिथेच बनेल जिथे रामलला विराजमान आहेत,’ असेही ते म्हणाले. ‘आता आम्ही आलो आहेात. रामलला आता तंबूत नव्हे तर मंदिरात विराजमान होतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुस्लिम कारसेवक मंचचा अध्यक्ष असल्याचा दावा करणारे आझम खान यांना काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. खान यांनी लखनऊ येथे सुमारे १० ते १२ ठिकाणी अयोध्येत राम मंदिर बनवण्याच्या मागणीचे होर्डिंग व पोस्टर लावले होते. या होर्डिंगवर खान यांनी स्वत:चा फोटो छापला होता व ‘देश के मुसलमानों का यही है मान, श्री राम मंदिर का हो वहीं निर्माण,’ असे म्हटले होते. हे होर्डिंग्ज लावल्यानंतर मला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on April 21, 2017 12:55 pm

Web Title: muslim karsewak manch members in ayodhya with full truck of bricks