News Flash

‘राम चरित्र मानस’, ‘गीता’ वाचणाऱ्या मुस्लीम व्यक्तीवर हल्ला

हिंदू धर्मग्रंथ वाचणाऱ्या एका मुस्लीम व्यक्तीला माणसाला मुस्लीम युवकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

हिंदू धर्मग्रंथ वाचणाऱ्या एका मुस्लीम व्यक्तीला मुस्लीम युवकांनी मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. गुरुवारी ५५ वर्षीय दिलशेर आपल्या घरामध्ये हिंदू धर्मग्रंथ वाचत असताना झाकीर आणि समीर हे दोन तरुण त्यांच्या घरामध्ये घुसले व त्यांना मारहाण केली. दिलेशर १९७९ सालापासून ‘राम चरित्र मानस’ आणि ‘गीता’ या हिंदू ग्रंथांचे वाचन करत आहेत.

झाकीर आणि समीरने त्यांची बाजाची पेटी मोडली व त्यांचे धर्मग्रंथ सोबत घेऊन गेले. हे ग्रंथ वाचू नका अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिलशेर यांना देण्यात आली. दिलशेर सुरक्षा रक्षकाचे काम करतात.

मी डयुटीवरुन परतल्यानंतर आंघोळ करुन ‘राम चरित्र मानस’ वाचण्याची तयारी करत होतो. त्यावेळी हे युवक माझ्या घरात घुसले व त्यांनी मारहाण केली. हिंदू ग्रंथ वाचून मला मानसिक शांतता मिळते. माझ्या समाजानेच वेळोवेळी माझा विरोध केला आहे. दिल्ली गेट पोलीस स्थानकात दिलशेर यांनी तक्रार नोंदवली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 6:00 pm

Web Title: muslim man attacked for reading hindu scriptures uttar pradesh dmp 82
Next Stories
1 विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नी आणि मुलांची हत्या करुन आत्महत्या
2 महिला पोलिसाने चोराच्या ATM कार्डावरुन काढले अडीच लाख रुपये
3 देशातील लोकशाही धोक्यात, जातीवादी पक्ष जबाबदार – एच डी देवेगौडा
Just Now!
X