फ्रान्सच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तेथे जंगी स्वागत झाले. पॅरिस विमानतळावर गुजरातमधील दाऊदी बोहरा मुस्लीम समाजाने पंतप्रधान मोदींचे तिरंगा फडकवत स्वागत केले. यावेळी भारतीयांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून सोडला. या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला. मात्र भारताच्या पंतप्रधानांचे मुस्लीम समाजाने केलेले हे स्वागत पाकिस्तानला फारसे आवडले नाही. भारत सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा अपप्रचार करणाऱ्या पाकिस्तानच्या एका मंत्र्याने यासंदर्भात ट्विट करुन आपल्या रागाला वाट मोकळी करुन दिली.

पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये फ्रान्समधील भारतीय मुस्लीम मोदींशी हस्तांदोलन करुन त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत. त्यापैकी एका व्यक्तीने मोदींना तिरंगा झेंडा घेऊन त्यांचे स्वागत केल्याचेही व्हिडिओत दिसते.

पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या सरकारमध्ये माहिती मंत्री असणाऱ्या फवाद चौधरी यांनी पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ रिट्विट करताना कोट करुन ‘या नाटकासाठी किती पैसे खर्च केले?’ असे ट्विट केले आहे.

चौधरी यांच्या या ट्विटवर अनेकांनी त्यांना ट्रोल केले.

१)
पैसे जी गोष्ट आपल्याकडे नाही त्याबद्दल बोलू नये

२)
कशाला?

३)
कितीही लागू द्या ही गोष्ट लक्षात ठेवा

४)
कसं बोलावं ते तरी शिका

५)
चोर आला चोर आला

६)
इथे कसा आलास

७)
आम्हाला परवडतं तरी

८)
प्रत्येकाचा दृष्टीकोन

९)
ते कोण आहेत जाणून घ्या

१०)
प्रेम विकत घेता येत नाही

याआधीही फावाद यांनी भारतीय लष्करातील पंजाबी सैनिकांनी असहकार पुकारला पाहिजे असे वादग्रस्त ट्विट केले होते. “भारतीय लष्करातील सर्व पंजाबी जवानांनो, काश्मीरमध्ये जो अन्याय आणि अत्याचार सुरू आहे, त्यात सहभागी होऊ नका. त्या भागात सेवेवर जाण्यास तुम्ही नकार द्या”, असे ट्विट फवाद यांनी केले होते. फवाद यांच्या त्या ट्विटला भारताची नेमबाज हिना सिधू हिने सडेतोड उत्तर दिले होते. “भारताच्या सुरक्षेसाठी पंजाबी लोक कायमच तत्पर राहिले आहेत. मी पंजाबी आहे आणि सिधू आहे. शिख समाजाचा इतिहास तुम्ही वाचला असाल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे लष्कराचा विषय बाजूला राहू दे .. आमची (भारताची) सुरक्षा करण्यासाठी आम्ही लष्करी सेवेतच भरती होण्याची गरज नाही”, असे हिनाने फवाद यांना सुनावले होते.