News Flash

मशीद पाडकाम प्रकरण: एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची निर्दोष मुक्तता

काँग्रेसच्या नेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी ओवैसी यांनी केली.

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी. (संग्रहित छायाचित्र)

मुथंगा येथे २००५ मधील मशीद पाडकाम प्रकरणी तेलंगणातील सांगारेड्डी न्यायालयाने आज, गुरुवारी निकाल दिला. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यासह इतर चार जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

ओवैसी यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बेकायदेशीरपणे मशीद पाडण्याची परवानगी देणाऱ्या काँग्रेसने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. २००५ मध्ये सत्तेत आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. त्या नेत्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, असे ट्विट ओवैसी यांनी केले आहे.

२००५ मध्ये आंध्र प्रदेशात काँग्रेसची सत्ता आली होती. त्यानंतर तातडीने महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामात अडथळा ठरणाऱ्या तीन मशिदी पाडल्या. त्यानंतर मुथंगी गावातील मशीद पाडण्यात आली. त्यावेळी स्थानिक मुस्लिम बांधवांनी आणि एमआयएमच्या नेत्यांनी या कारवाईविरोधात निदर्शने केली होती. माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्याचवेळी एमआयएमच्या नेत्यांना अटक केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:21 pm

Web Title: muthangi masjid demolition case asaduddin owaisi four others acquitted
Next Stories
1 अखिलेश यादव यांनी बोलावली समर्थकांची बैठक, मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2 नोटाबंदी हा भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा; काँग्रेसचा गंभीर आरोप
3 आयसिसमध्ये दाखल झालेल्या कल्याणमधील तरुणाचा मृत्यू
Just Now!
X