सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून, मुथूट ग्रुप या भारतातील आघाडीच्या बिझनेस समूहाने सरकारी अधिकारी आणि स्थानिक एनजीओ यांच्या सहयोगाने भारतभर सध्या लॉकडाउन सुरू असल्याने फटका बसलेल्या देशभरातील १५,००० हून अधिक कुटुंबांना अन्न, अन्नधान्य व आवश्यक वस्तू पुरवल्या आहेत. कंपनीने भारतभर उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर, महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा या राज्यांमध्ये या उपक्रमाचे आयोजन केले होते. या कुटुंबांना मोफत अन्न देण्याबरोबरच, कंपनीने राज्य सरकारने आयोजित केलेल्या कम्युनिटी किचनसाठीही मदत केली. कंपनीने आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना मास्क, ग्लोव्ह व सॅनटायझर अशा गरजेच्या वस्तूही दिल्या.

सीएसआर उपक्रमाविषयी बोलताना, व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज अॅलेक्झांडर मुथूट यांनी सांगितले, “या प्रकारचे उदात्त उपक्रम आयोजित करण्यामध्ये मुथूट ग्रुप नेहमीच आघाडीवर असतो. अशा अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये, आपण सर्वांनी एकत्र यायला हवे आणि आपल्या पाठिंबाची व आपुलकीची आवश्यकता असलेल्या सर्वांसाठी शक्य तितकी सर्व प्रकारची मदत करायला हवी.”

केंद्रीय पद्धतीने अन्नधान्य संपादित करण्यात आले आणि काळजीपूर्वक पॅक करण्यात आले. त्यानंतर, 3 ते 5 दिवसांच्या कालावधीत या जिल्ह्यांतील सर्वाधिक गरजू व बाधित कुटुंबांना ही पाकिटे देण्यात आली. संपादन, पॅकेजिंग व वितरण करत असताना जास्तीत जास्त निगा व वैयक्तिक स्वच्छता राखण्यात आली.