* सर्वोच्च न्यायालयाचे उत्तरप्रदेश सरकारला आदेश
मुझफ्फरनगर येथे उसळेल्या दंगलीनंतर तेथील मुस्लिम दंगलग्रस्त कुटुंबियांना उत्तरप्रदेश सरकारने आर्थिक मदत देणे सुरू केले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरूवार) दंगलग्रस्तांपैकी फक्त मुस्लिम कुटुंबियांना मदत करणे योग्य नाही. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारने ही मदत लवकरातलवकर थांबवावी असा आदेश जारी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, दंगलग्रस्तांपैकी फक्त एका जातीला महत्व देऊन त्याच जातीच्या कुटुंबियांना मदत करणे योग्य नाही. या दंगलीत जीवीतहानी, वित्तहानी झालेल्या सर्व जातीच्या दंगलग्रस्तांना मदत दिली गेली पाहिजे. नाहीतर इतर जातींना डावळल्यासारखे होईल.
यावर उत्तरप्रदेश सराकारने फक्त मुस्लिम दंगलग्रस्त कुटुंबियांना देवू केलेली प्रत्येकी पाच लाखांची मदत थांबविली आहे.