येथील खुड्डा या खेडय़ात एकाने पत्नीच्या अंगावर अ‍ॅसिड (आम्ल) फेकल्याने ती जखमी झाली आहे. घरगुती भांडणातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
शबनम व साजिद हे घरी परतत असताना त्यांच्यात मोटारीत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर साजिदने शबनम हिच्यावर मोटारीतच हल्ला केला, ती उतरून पळून जाऊ लागली असता त्याने तिचा पाठलाग करून अ‍ॅसिड फेकले. शबनम भांडणानंतर तिच्या आईवडिलांकडे राहत होती व आता ती परत आली असताना पतीने हे कृत्य केले.