बिहारमधील मुजफ्परपुरमध्ये मुख्यमंत्रि नितीश कुमार यांच्या प्रचारसभेदरम्यान मुर्दाबादची घोषणाबाजी झाली. हे ऐकून मुख्यमंत्र्यांनी विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना एक सल्ला दिला. तुमच्या आई-वडिलांना जाऊन आरजेडी शासनकाळामध्ये परिस्थिती काय होती विचारा असा खोचक सल्ला मुख्यमंत्र्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना दिला. तुमची आई तुम्हाला सांगेल तेव्हा काय परिस्थिती होती, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

रविवारी मुजफ्परापूरमधील कांटी येथे मुख्यमंत्र्यांची संभा झाली. त्यावेळी मंचाच्या एका बाजूला असणाऱ्या काही तरुणांनी मुर्दाबादच्या घोषणा दिला. ते पाहून नितीश कुमार यांनी, “मुर्दाबादच्या घोषणा का देत आहात?, ज्यांच्यासाठी जिंदाबादच्या घोषणा देत आहात त्यांना ऐकायला जा ना,” असा टोला मंचावरुनच लगावला. आम्ही समजातील सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय तर ते लोकं समाजाता फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पुन्हा वादाचे वातावरण तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केला.

“तुम्हाला इथे कोणी काहीच करणार नाही. तुम्ही १० लोकं आहात आणि इथे हजारो लोक आहेत. तरी कोणीही तुम्हाला काही करणार नाही. काही केलंच तर त्याचा त्यांना (विरोधकांना) फायदा होईल.” असंही मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी वाचा- …तर नितीश कुमार गजाआड असतील – चिराग पासवान

आरजेडीच्या कार्यकाळातील प्रशासनासंदर्भात प्रश्न उपस्थित करताना मुख्यमंत्र्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना, “तेव्हा काय परिस्थिती होती आपल्या आई-वडिलांना जाऊन विचारा. संध्याकाळ झाल्यानंतर त्यांना घरातून बाहेर पडता येत होतं का विचारा. शाळांमध्ये शिक्षण मिळत होतं का. कोणावर उपचार होत होते का. जरा माहिती करुन घ्या. वडिलांना नीट सांगता येणार नाही मात्र तुमच्या आईला जाऊन विचाराल तर नक्कीच ती योग्य माहिती देईल,” असं म्हटलं.

आणखी वाचा- “नितीशकुमार दिल्लीत जातील, बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होईल”

नितीश यांनी लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. “ते काय करायचे. पती (लालू प्रसाद यादव) आतमध्ये गेले (चारा घोटाळा प्रकरण) तर पत्नीला (राबडी देवी) गादीवर (मुख्यमंत्री पदावर) बसवून गेले. महिलांसाठी काहीच काम झालं नाही. गरीबाच्या मुलांना प्राथमिक शिक्षणही मिळत नव्हते,” असा टोला नितीश यांनी लगावला.

आणखी वाचा- चिराग पासवान यांचा भाजपा उमेदवारांना पाठिंबा; बिहारच्या मतदारांना केलं आवाहन

काही लोकं गोंधळ निर्माण करुन मतं मिळवू पाहत आहेत. मात्र तुम्ही सतर्क राहा, असा सल्ला नितीश यांनी तरुणांना दिला. एकमेकांमध्ये वाद निर्माण करुन देणं हे काही लोकांच काम आहे. ज्यांना काम करण्याची इच्छा नाहीय ते लोकं असे वाद निर्माण करतात. काही लोकं माझ्या विरोधात बोलतात. मी त्यांचे आभार मानतो. माझ्याविरोधात बोलल्याने ते माझाचा प्रचार करत आहेत. माझ्याविरोधात बोलत राहिलात तरी मला काहीच आक्षेप नाही, असंही नितीश म्हणाले.