News Flash

माझे बालपण रेल्वे फलाटांवर गेले आहे: नरेंद्र मोदी

आपल्या देशातील रेल्वेचा विकास होणे गरजेचे आहे.

PM Modi : सध्याच्या घडीला भारतीय अर्थव्यवस्थेतील परकीय गुंतवणूक सर्वोच्च पातळीवर आहे. याशिवाय, हळूहळू आर्थिक वित्तीय तूट कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भविष्यात उत्पादन, वाहतूक, नागरी उड्डाण आणि अन्य क्षेत्रांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था जोमाने प्रगती करेल. २०४० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार पाचपटीने वाढेल, असा विश्वासही यावेळी मोदी यांनी व्यक्त केला.

माझे रेल्वेशी खूप जुने नाते आहे. माझे बालपण रेल्वेच्या फलाटांवर गेले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी केले. नवी दिल्लीतील सूरजकुंड येथील रेल्वे विकास शिबिरात व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. देशाच्या प्रगतीसाठी रेल्वेची प्रगती होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

जगातील सर्व देशांमधील रेल्वेमध्ये बदल घडून आला आहे. मग आपणच एका सीमेत राहण्याचे कारण काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भारताला गती आणि प्रगती रेल्वे विकासामुळेच प्राप्त होईल, हे लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येक अधिकारी आपले काम चांगल्या पद्धतीने करत आहे. पण एकमेकांच्या सहकार्याने हे काम केले पाहिजे. रेल्वेची अधिक प्रगती कशी होईल, याचा प्रत्येकानेच विचार करायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या देशातील रेल्वेचा विकास होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या मजबूतही व्हायला हवी. त्याचा भारतालाच फायदा होईल. विशेषतः रेल्वेसाठी काम करणाऱ्या लोकांनाच त्याचा अधिक फायदा होईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. रेल्वेच्या अर्थसंकल्पात कधीही राजकारण आलेले नाही. आम्ही रेल्वेच्या परिवर्तनाच्या दिशेने उत्कृष्ट काम करत आहोत, असेही मोदींनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 8:25 pm

Web Title: my childhood was spent on platforms says pm narendra modi
Next Stories
1 नोटाबंदीचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवा, पंतप्रधानांचा खासदारांना आदेश
2 केजरीवालांनी मारले एका दगडात दोन पक्षी; भाजपसह काँग्रेसवर साधला निशाणा
3 नोटाबंदीनंतर बनावट नोटांचा धंदा पूर्णपणे ठप्प: रिजिजू
Just Now!
X