पंजाब नॅशनल बँकेला १३५०० कोटी रुपये कर्जाचा गंडा घालणारा आणि बार्बुडातून व अँटिग्वामधून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला डोमिनिकामधून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याचदरम्यान त्याची पत्नी प्रीति चोक्सीने मेहुलच्या जिवाला धोका असल्याचा भीती व्यक्त केलीय. प्रीतिने डोमिनिकाच्या सुमद्रकिनाऱ्यावर मेहुलसोबत दिलेल्या त्याच्या कथित गर्लफ्रेण्डसंदर्भातही महत्वाचा खुलासा केलाय. मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली त्या दिवशी काय घडलं यासंदर्भातही प्रीतिने सविस्तरपणे भाष्य केलंय.

‘बिझनेस स्टॅण्डर्ड्स’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये प्रीती चोक्सीने २३ मे रोजी माझे पती रात्रीच्या जेवणासाठी घराबाहेर गेले होते. मात्र ते घरी परतले नाही. बराच वेळ मेहुल घरी न परतल्याने मी आमच्या एका सल्लागाराला आणि स्वयंपाक्याला त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवलं होतं. मात्र मेहुलचा काहीच पत्ता लागला नाही तेव्हा आम्ही पोलिसांना संपर्क केल्याचं प्रीतिने म्हटलं आहे.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
fraud in recruitment exam of Mahanirmiti case against four including two candidates
महानिर्मितीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार, दोन उमेदवारांसह चौघांविरोधात गुन्हा

मेहुल चोक्सीच्या पत्नीने मुलाखतीमध्ये, “सायंकाळी साडेपाच वाजता मेहुलला एका बोटीवर नेण्यात आलं आणि तरीसुद्धा कोणीही त्यांना त्या बोटीवर जाताना पाहिलं नाही हे समजल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. त्यांची कारही घटनास्थळावर नव्हती. ती गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास सापडली. पोलिसांना सकाळी गस्त घालताना ही गाडी सापडली,” असं सांगितलं.  प्रीतिला मुलाखतीदरम्यान मेहुल यांच्यासोबत नाव जोडलं जाणाऱ्या मुलीसंदर्भात म्हणजेच बारबरा जैबरिकासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना, “मला माहितीय की मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ती अँटिग्वा आली होती. तेथील बेटांवरील आमच्या दुसऱ्या घरीही ती येऊन गेली होती. तेथील स्वयंपाक्यासोबत तिची चांगली मैत्री झाली होती,” असं प्रीतिने सांगितलं.

नक्की पाहा हे फोटो >> मेहुल चोक्सीसोबत ज्या मुलीचं नाव जोडलं जातंय ती आहे तरी कोण?

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये बारबरा ही खूप सुंदर आणि मदक दिसत असल्याने मेहुल तिच्याकडे आकर्षित झाल्याचा दावा फेटाळून लावलाय. “बारबरा वेगली दिसायची. ती जशी दिसायची तशी ती मूळीच नव्हती. ती आणखीन सुंदर दिसत असणार. ते काहीही असलं तरी सध्या चर्चेत असणाऱ्या फोटोंमध्ये दिसणारी मुलगी बारबरा नाही हे नक्की,” असंही प्रीति यांनी म्हटलं आहे.

मेहुलची प्रकृती ठीक नसल्याने त्याने मागील तीन वर्षांपासून डोमिनिकामधील आपलं घर सोडून इतर ठिकाणी प्रवास केला नव्हता असं प्रीतिने स्पष्ट केलं आहे. मेहुलला कोणत्या वकिलाला भेटण्यास तसेच आरोग्य सुविधा घेण्यासाठीही परवानगी दिली जात नसल्याचा आरोप प्रीतिने केलाय. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर तिने मेहुलच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. “प्रसार माध्यमे वाटेल त्या कथा सांगत आहेत. चोक्सी फरार झाला असं सांगितलं जात आहे. भारतीय संविधानातील कलम ९ नुसार माझे पती आता भारतीय नागरिक नाहीयत. २०१७ मध्ये त्यांनी अँटिग्वाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. त्यामुळे सध्या जगात त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित जागा ही अँटिग्वाच आहे,” असंही प्रीतिने म्हटलं आहे.