कर्नाटकमधील हुरा गावांत एक अजब लग्न पहायाला मिळाले. येथे ‘वधू’ लाजत नव्हती मात्र, लाथा मारत होती. दुसऱ्या गावांतून आलेली ‘वधू’ घाबरलेली होती. दुसरीकडे पाहुण्यांना एक मोठी समस्या होती चार वर्षाचा ‘वर’ हिंसक होता. चार वर्षाच्या ‘वर’ला हिंसकपणे चावा घेण्याची सवय आहे. त्याची ही सवय मोडावी म्हणूनच गावकऱ्यांनी त्याचे लग्न लावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा चार वर्षाचा ‘वर’ हुरा गावातील गाढव आहे. या गाढवासाबोत असलेल्या गाढविणीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून गाढवाचे संतुलन बिघडले होते. पण आता हुरा गावातील लोकांनी त्याला जिवनसाथी मिळवून दिली आहे. गावकऱ्यांनी या एकाकी असलेल्या गाढवाचे विधीपुर्वक लग्न लावले. लग्नानंतर गावकऱ्यांनी मिठाईही वाटली. या लग्नामध्ये गाढवाने मंगळसुत्र बांधले. यावेळी दोघांना नवी कपडे घालून लग्नातील वधू-वराप्रमाणे सजवण्यात आले होते.

जुलैमध्ये बिबट्याच्या हल्यात गाढवाच्या साथीदाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा गाढव आक्रमक झाला होता. तेंव्हापासून दिसेल त्याच्या अंगावर जाणे, चावणे अशा गोष्टी गाढव करत होता. साथीदाराच्या मृत्यूपूर्वी गाढवाचे वागणे ठिक होते असे गावकरी सांगतात.

हुरा गावातील लोकांनी चमराजनगर येथे गाढवासाठी गाढवीण शोधली. गावकऱ्यांनी गाढविणीच्या मालकाला विचारल्यावर त्यांनीही लगेच होकार दिला. लोक गाढविणीसाठी पैसे जमवत होते. पण चमराजनगरच्या व्यक्तीने गाढवीणसाठी एकही पैसा घेतला नाही. जमा झालेल्या पैशातून गावकऱ्यांनी दोघांचे रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावून दिले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mysuru villagers find lonely donkey a bride
First published on: 21-09-2018 at 13:30 IST