पंजाबमधील नाबा तुरुंगातून खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख हरमिंदर मिंटूसह चार कैदीफरार झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार रविवार सकाळी पोलिसांच्या गणवेशामध्ये १० सशस्रधारक अज्ञातांनी नाभा तरुंगात घुसले. तुरुंगात घुसल्यानंतर त्यांनी बेधुंद गोळीबार केला. हल्ल्यानंतर त्यांनी लिबरेशन फोर्सचा प्रमुख दहशतवादी हरमिंदर मिंटूसह ४ कैद्यांची तुरुंगातून सुटका करुन फरार झाले आहेत. लिबरेशन फोर्सचा प्रमुख हरमिंदर मिंटूसह या हल्लेखोरांनी आणखी चार कैद्यांना तरुंगातून पळवून नेले आहे. यामध्ये गुरप्रीत सिंग, विकी गोंदरा, नितीन देओल आणि विक्रमजीत सिंग  या कैद्यांचा समावेश आहे.

तुरुंगात घुसलेल्या १० हल्लेखोरांनी तब्बल १०० गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर पोलिस प्रशासन यासंदर्भात अधिक चौकशी करत आहे. राज्याचे पोलिस अधिक्षक एस एस ढिल्लन यांनी तुरुंगात घडलेल्या या प्रकाराला पुष्टी दिली आहे. पोलिसांनी तुरुंग परिसराला घेराव घातला असून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. नाभा तुरुंगावरील हल्ल्यानंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.