News Flash

केंद्राने कांद्याचा निर्यात दर वाढवला

सध्या देशात कांद्याचे दर चांगलेच कडाडले असून देशांतर्गत बाजारातील कांद्याचे दर नियंत्रणात राहावे आणि निर्यात कमी व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात दरात वाढ

| September 20, 2013 12:07 pm

सध्या देशात कांद्याचे दर चांगलेच कडाडले असून देशांतर्गत बाजारातील कांद्याचे दर नियंत्रणात राहावे आणि निर्यात कमी व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता कांद्याचा कमीत कमी निर्यात दर प्रति टन ९०० डॉलर इतका निश्चित केला आहे.
गेल्या महिन्यात १४ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने कांद्याचा कमीत कमी निर्यात दर प्रति टन ६५० डॉलर इतका ठेवला होता. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीत घट झाली होती. आता निर्यात दरात आणखी वाढ झाल्यामुळे निर्यातीला आळा बसेल. त्यामुळे सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीसाठी प्रति टन कमीत कमी दर ९०० डॉलर इतका असल्याचे परकीय व्यापार महासंचालकांनी आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रति किलो ७० ते ८० रुपये आहेत. कांद्याचे दर नियंत्रणात राहावे यासाठी सर्व राज्यांना कांद्याची साठेबाजी रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचेआदेश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 12:07 pm

Web Title: nafed suggests increase in onion mep to 900tonne
टॅग : Onion Prices,Onion Rate
Next Stories
1 शाळा आणि सहकारी संस्थांना खासदार निधीतून मदत
2 ब्लेअर कन्येला बंदुकीचा धाक दाखवून रोखले
3 बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांचे निधन
Just Now!
X