01 December 2020

News Flash

चीन सैन्याशी दोन हात करणाऱ्या २० शहीद जवानांची नावं लष्कराकडून प्रसिद्ध

दोन्ही देशात लष्करी चर्चा सुरू असताना उफाळला होता संघर्ष

प्रातिनिधिक फोटो

भारत-चीन दरम्यान सोमवारी रात्री सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असताना चीनने आगळीक करून भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. यात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले होते, तर चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याचं वृत्त आहे. या घटनेत वीरमरण आलेल्या जवानांची नावं प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शहीद झालेल्या जवानांची नाव अशी…

कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू (हैदराबाद)

नायक सुभेदार नुदुरम सोरेन(मयूरभंज)

नायक सुभेदार मंदीपसिंह (पटियाला)

नायक सुभेदार सतनाम सिंह (गुरूदासपूर)

हवालदार के. पालानी (मदुराई)

हवालदार सुनील कुमार (पटणा)

हवालदार बिपुल राय (मेरठ शहर)

नायक दीपक कुमार (रीवा)

शिपाई राजेश ओरांग (बीरभूम)

शिपाई कुंदन कुमार ओझा (साहेबगंज)

शिपाई गणेश राम (कांकेर)

शिपाई चंद्रकांता प्रधान (कंधमाल)

शिपाई अंकुश (हमीरपूर), शिपाई गुरबिंदर (संगरूर)

शिपाई गुरतेज सिंह (मनसा)

शिपाई चंदन कुमार (भोजपूर)

शिपाई कुंदन कुमार (सहरसा)

शिपाई अमन कुमार (समस्तीपूर)

शिपाई जय किशोर सिंह (वैशाली)

शिपाई गणेश हंसदा (पूर्व सिंहभूम)

या जवानांना चीन सैन्यासोबत झालेल्या संघर्षात वीरमरण आले.

चीनच्या सीमेवर अशा प्रकारे भारतीय जवान शहीद होण्याची अशी घटना १९७५नंतर प्रथमच घडली आहे. त्या वेळी अरुणाचल सीमेवर आसाम रायफल्सचे चार जवान मृत्युमुखी पडले होते. दोन्ही देशांदरम्यान अनेक वर्षांपूर्वी झालेल्या करारानुसार कोणत्याही परिस्थितीत सीमेवरील संघर्षांदरम्यान बंदुका न चालवण्याविषयी खबरदारी घेतली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 3:32 pm

Web Title: names of the 20 indian army personnel who lost their lives in the violent face off with china bmh 90
Next Stories
1 लग्नामध्ये मिठाईवरुन राडा, नवरदेवाने नवरीच्या ९ वर्षीय भावाची केली हत्या
2 भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही – नरेंद्र मोदी
3 “त्या २० शहीद जवानांचे चेहरे आपल्याकडे बघताहेत अन् पंतप्रधान गप्प आहेत”
Just Now!
X