News Flash

निश्चलनीकरण हा मोदींचा धाडसी निर्णय

फ्रान्सकडून पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत

| January 16, 2017 02:35 am

जीन-मार्क अ‍ॅरॉल्ट

फ्रान्सकडून पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत

फ्रान्सने भारतातील निश्चलनीकरणाच्या निर्णयाचे कौतुक केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा धाडसी निर्णय असल्याचे म्हटले आहे. करचुकवेगिरी, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात नरेंद्र मोदी यांनी केलेली ही शस्त्रक्रिया इतरांनाही मार्गदर्शक असल्याचे फ्रान्सने म्हटले आहे.

फ्रान्सचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय विकासमंत्री जीन-मार्क अ‍ॅरॉल्ट यांनी भारताने केलेल्या निश्चलनीकरणाचे स्वागत केले. मोदींच्या या निर्णयामुळे विदेशी गुंतवणूकदार आकर्षित झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, ‘मेक इन इंडिया’चेही त्यांनी या वेळी कौतुक केले. युरोपियन संघ आणि भारताच्या संयुक्त प्रयत्नांमुळे व्यापारी अडथळे कमी करता येणे शक्य आहे. तसेच, यामुळे आयात-निर्यात धोरण सुधारेल आणि भारतातील विकासाला चालना मिळेल, असेही अ‍ॅरॉल्ट म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयानी मी खूश झालो आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा आणि कर चुकवेगिरी करणारांविरोधात मोदी कसा निर्णय घेऊ शकतात हेच याद्वारे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था बळकटीस मदतच मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 2:35 am

Web Title: narendra modi 10
Next Stories
1 लघुग्रह आघातानंतर पृथ्वी थंड पडून डायनॉसॉर्सचा मृत्यू
2 फाल्कन ९ अग्निबाणाचा मोठा भाग उपग्रह सोडून पृथ्वीवर परत
3 निवडणुका होत असलेल्या राज्यांत मंत्र्यांनी तक्रारींवर सुनावणी टाळावी
Just Now!
X