24 September 2020

News Flash

दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; केंद्राकडून योजनांची आखणी

| April 9, 2016 01:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; केंद्राकडून योजनांची आखणी
देशातील महत्त्वाच्या राज्यांना सध्या दुष्काळाने ग्रासले असतानाच दुष्काळावर कामयस्वरूपी तोडगा काढण्याचा केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी येथे स्पष्ट केले. येथील प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी दुष्काळनिवारणासाठी केंद्राकडून अनेक योजनांची आखणी सुरू असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तर कर्नाटक व उत्तर प्रदेशचा काही भाग आदी ठिकाणी दुष्काळ असून पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना मोदी यांनी दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, बिहार, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, पश्चिम बंगाल, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांत दुसरी हरितक्रांती लवकरच होईल, असे आश्वासन मोदींनी दिले. पुढील तीन वर्षांत १८ हजार खेडय़ांना वीज दिली जाईल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
आसाममध्ये तीन हजार खेडय़ांमध्ये विजेचे खांबही पोहोचलेले नाहीत. देशभरातील गेल्या तीन ते चार महिन्यांत ९०० खेडय़ांमध्ये वीज पोहोचल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्रह्मपुत्रेसारखी नदी असतानादेखील आसामच्या नागरिकांना पाण्यापासून कशासाठी वंचित राहावे लागते, असा सवाल करीत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. या वेळी मतदार काँग्रेसला धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसने घराणेशाहीचे राजकारण व भ्रष्टाचाऱ्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. घुसखोरीचा प्रश्न सोडवायला हवा, अन्यथा आसामचा विकास कठीण असल्याचे मोदींनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:00 am

Web Title: narendra modi 3
टॅग Narendra Modi
Next Stories
1 सुरक्षेबाबत राजनाथ सिंह यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
2 उत्तराखंडबाबतच्या याचिकांवर १८ एप्रिलला सुनावणी
3 राजेंद्र कुमार छापेप्रकरणात सीबीआयवर नामुष्की
Just Now!
X