21 October 2019

News Flash

पंतप्रधान मोदी इंग्रजीत एक ओळही बोलू शकत नाहीत – ममता बॅनर्जी

पंतप्रधान मोदींना इंग्रजीत बोलण्यासाठी सतत टेलिप्रॉम्पटरची गरज भासते अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्रजीमध्ये एक ओळही व्यवस्थित बोलू शकत नाहीत. इंग्रजी बोलताना त्यांना सतत टेलिप्रॉम्पटरची मदत घ्यावी लागते अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी केली आहे. मोदी अनेक भाषणं देतात पण ते इंग्लिशमध्ये ते एक ओळही व्यवस्थित बोलू शकत नाहीत. त्यामुळे इंग्रजीमध्ये बोलताना त्यांना सतत टेलिप्रॉम्पटरकडे बघावे लागते असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

एका बंगाली वेबसाईटच्या हवाल्याने इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. सर्व मीडियाला हे माहित आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये काय बोलायचे आहे ते मोदी स्क्रिनकडे बघून बोलतात असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. केंद्र सरकारच्या आयुषमान भारत योजनेतून बाहेर पडत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी जाहीर केले.

देशातील १० कोटी गरीब जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पंतप्रधान मोदींनी मागच्यावर्षी ही योजना जाहीर केली होती. ममता बॅनर्जी मोदी सरकारच्या कडव्या टीकाकार म्हणून ओळखल्या जातात.

First Published on January 11, 2019 2:57 pm

Web Title: narendra modi cant speak a line in english properly mamata banerjee