07 December 2019

News Flash

काँग्रेसच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्र खिसे भरण्याचे साधन – मोदी

लष्कराच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष केल्याची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी

लष्कराच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष केल्याची टीका

काँग्रेसच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्र केवळ सौदे करून खिसे भरण्यासाठी होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सभेत केला. ‘राफेल’ खरेदी व्यवहाराबाबत पंतप्रधान कार्यालयाने समांतर चर्चा केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली होती. तिचा समाचार पंतप्रधान मोदींनी पेरुमन्नालूर येथील सभेत घेतला.

समुद्रापासून आकाशापर्यंत संरक्षणाशी संबंधित अनेक गैरव्यवहार काँग्रेसने केल्याची टीका मोदी यांनी केली. सत्तेवर असताना काँग्रेसने अनेक वर्षे संरक्षण दलाचे आधुनिकीकरण होऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला. वर्षांनुवर्षे ज्यांची देशावर सत्ता होती, त्यांनी संरक्षण क्षेत्राकडे कधी लक्ष दिले नाही. त्यांच्या दृष्टीने हे क्षेत्र सौदेबाजीचे होते आणि तो आपल्या मित्रांना करून देण्याचा उद्योगही होता. संरक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा दृष्टिकोन वेगळा आहे, असा दावाही पंतप्रधानांनी केला. या क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण व्हावे हे आमच्या सरकारचे स्वप्न आहे, असे ते म्हणाले. विरोधक माझ्यावर टीका करतात, त्यांना प्रसिद्धी मिळते. मात्र निवडणुका कार्यक्रमावर लढविल्या जातात, टीकाटिप्पणीवर नव्हे, असे त्यांनी नमूद केले.

आमच्या सरकारच्या चांगल्या कामामुळे काही लोकांना दु:ख होते. त्यांच्या या दु:खाचे पर्यवसान निराशेत आणि मोदींच्या नावाने बोटे मोडण्यात होते, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांचा समाचार घेतला.

First Published on February 11, 2019 12:14 am

Web Title: narendra modi comment on congress party 8
Just Now!
X