News Flash

यंदाची विजयादशमी देशासाठी विशेष

‘लक्ष्यभेदांच्या’ पाश्र्वभूमीवर मोदींचे प्रतिपादन

| October 10, 2016 01:06 am

यंदाची विजयादशमी देशासाठी विशेष
दीनदयाळ उपाध्याय यांच्यावरील पुस्तकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व  संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते  दिल्लीत झाले.

लक्ष्यभेदांच्यापाश्र्वभूमीवर मोदींचे प्रतिपादन

भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या सर्जिकल हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर, या वर्षीची विजयादशमी देशासाठी ‘अत्यंत विशेष’ अशी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. सामथ्र्यवान राष्ट्रासाठी ‘अतिशय सक्षम’ अशी सैन्य दले असणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

या वर्षीची विजयादशमी देशासाठी अत्यंत विशेष अशी आहे, असे मोदी यांनी विज्ञान भवनातील एका कार्यक्रमात सांगितले.

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल हल्ल्यांचा संदर्भ मोदी यांच्या वक्तव्याला होता. धर्माचा अधर्मावर विजय दर्शवणाऱ्या या सणानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. जनसंघाचे माजी अध्यक्ष दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन आणि शिकवण यावरील १५ पुस्तकांच्या संग्रहाचे प्रकाशन त्यांनी यावेळी केले. पंडित उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष यंदा साजरे करण्यात येत आहे.

दीनदयाळ यांच्या लेखनाचा संदर्भ देऊन, बलवान राष्ट्रासाठी अत्यंत कणखर सैन्यबल असणे आवश्यक आहे, यावर मोदी यांनी भर दिला. कुठलाही देश सक्षम असणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2016 1:06 am

Web Title: narendra modi comment on vijayadashami festival
Next Stories
1 इंदिरा गांधी विमानतळावर किरणोत्सर्जक पदार्थाची गळती?
2 यूएस ओपन : एका न-नायकाचं वस्त्रहरण!
3 सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबाचे सर्वाधिक नुकसान, २० दहशतवाद्यांचा झाला खात्मा
Just Now!
X