05 March 2021

News Flash

बायकोची काळजी न घेणारा देश काय चालवणार – दिग्विजयसिंहांचा मोदींवर हल्ला

विरोधकांवर केलेल्या जळजळीत टीकांवरून नेहमी चर्चेत असणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी यावेळी नरेंद्र मोदींवर वैयक्तीक टीकास्त्र केले. नरेंद्र मोदी आपल्या पत्नीला सांभाळू शकले नाहीत,

| March 10, 2014 06:40 am

विरोधकांवर केलेल्या जळजळीत टीकांवरून नेहमी चर्चेत असणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी यावेळी नरेंद्र मोदींवर वैयक्तीक टीकास्त्र केले. नरेंद्र मोदी आपल्या पत्नीला सांभाळू शकले नाहीत, मग ते देशाची काय काळजी घेणार? असा जळजळीत सवाल दिग्विजय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरू उपस्थित केला आहे.
दिग्विजय म्हणतात की, माझा संशय खरा आहे. नरेंद्र मोदी आपल्या पत्नीची काळजी घेऊ शकले नाहीत आणि तिला सोडून दिले, मग त्यांच्याकडे संपूर्ण देशाची काळजी घेण्याची अपेक्षा कशी केली जाऊ शकते?

 

संघ आणि भाजपपेक्षा मोदींची प्रतिमा मोठी
दिग्विजय सिंह आपल्या तिखट टीकांसाठी प्रसिद्ध राजकारणी आहेत. याआधी मोदींना नपुंसक ठरविण्यापर्यंतची टीका काँग्रेसजन करून झाले आहेत. यावेळी मोदींच्या वैयक्तीक जीवनामध्ये हस्तक्षेप करत बायकोची काळजी न घेणारा देश काय चालवणार? असा सवाल दिग्विजय यांनी जनतेसमोर उपस्थित केला आहे.
‘त्या’ खासदारांनी शक्तीपेक्षा संसदीय कौशल्य दाखविले पाहिजे होते- दिग्विजय सिंह

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 6:40 am

Web Title: narendra modi could not take care of his own wife deserted her how can he be expected to take care of whole country digvijaysingh
Next Stories
1 गुजरात पर्यटनविभागासाठी चित्रीकरण करण्यापासून अमिताभ यांना मज्जाव
2 काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
3 हरियाणात भाजपसमोर पेचप्रसंग
Just Now!
X