गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधक दिवसेंदिवस एकमेकांविरोधात सभ्यता आणि शालीनतेची पातळी सोडून टीका करताना दिसताहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये सामील झालेले ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी मंगळवारी एका जाहीर सभेत असेच अतर्क्य विधान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्वचेचा रंग माझ्याप्रमाणेच काळा आहे. मात्र, ते रोजच्या आहारात तैवानवरून आणलेले मशरूम खातात. या एका मशरूमची किंमत ८० हजार रूपये इतकी आहे. पंतप्रधान मोदी दररोज असे पाच मशरूम खातात. त्यामुळेच ते गोरे दिसतात, असे वक्तव्य अल्पेश ठाकोर यांनी केले. आता भाजप अल्पेश यांना काय उत्तर देणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुजरात निवडणुकीमध्ये पाक हस्तक्षेप करीत असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. यावरून देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांनी मोदींना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. गुजरातमधील संभाव्य पराभवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी बिथरले असून, राजकीय फायद्यासाठी ते माजी पंतप्रधान आणि लष्करप्रमुखपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवीत आहेत.

काँग्रेसमधून नुकतेच निलंबित झालेले ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या उपस्थितीत ६ डिसेंबरला झालेल्या बैठकीचा उल्लेख करून आणि पाक लष्कराच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्विटचा संदर्भ देऊन मोदींनी गुजरात निवडणुकीमध्ये पाक हस्तक्षेप करीत असल्याचा सनसनाटी आरोप केला होता.

मोदींचा हटके प्रचार; साबरमती नदीतून सी-प्लेनने केला प्रवास

स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधानच खोटारडेपणा करीत असल्याच्या कृतीने मला धक्का बसला, वेदना झाल्या. गुजरातमधील संभाव्य पराभवाने पंतप्रधान बिथरल्याचे स्पष्ट दिसते. पण त्यामुळे माजी पंतप्रधान, लष्करप्रमुखांसह सर्वच घटनात्मक पदांचे अवमूल्यन करण्याचा धोकादायक पायंडा मोदी पाडत आहेत, असे सांगून सिंग पुढे म्हणाले, ‘दहशतवादाविरोधात लढण्याचा ज्यांचा इतिहास थिटा आहे, त्यांनी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीयत्वाचे धडे देऊ नयेत. पाकिस्तानला विनानिमंत्रण गेला होता, हे मोदींनी विसरू नये, असा टोला मनमोहन सिंग यांनी मोदींना लगावला होता.

भाजपसाठी विकास म्हणजे ‘हवा हवाई’; काँग्रेसने मोदींच्या सी-प्लेन प्रवासाची उडवली खिल्ली