गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला असला तरी मोदी यांना ब्रिटनकडून भेटीचे निमंत्रण आले आहे. देशातील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांमधील भारतीय समूहाकडून मोदी यांना ब्रिटन भेटीचे निमंत्रण देण्यात आले आहे. विरोधी लेबर पक्षाचे बॅरी गार्डिनर यांनी मोदी यांना ब्रिटन निमंत्रणाचे पत्र पाठविले आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मोदी यांनी ‘द फ्युचर ऑफ मॉडर्न इंडिया’ या विषयावर भाषण द्यावे, अशी इच्छा पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.