07 August 2020

News Flash

‘खालच्या जातीतून आल्यामुळेच काँग्रेसला माझे राजकारण नीच वाटते’

खालच्या जातीतून आल्यामुळे माझे राजकारण गांधी परिवाराला नीज राजकारण वाटत असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिले.

| May 6, 2014 11:11 am

खालच्या जातीतून आल्यामुळे माझे राजकारण गांधी परिवाराला नीज राजकारण वाटत असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिले. ट्विटवर ट्विट करून मोदींनी प्रियांका गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
अमेठी लोकसभा मतदारसंघात सोमवारी जाहीर सभा घेऊन मोदींनी गांधी घराण्यावर कडवी टीका केली होती. त्यानंतर प्रियांका गांधींनी लगेचच मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. अमेठीच्या भूमीवर मोदींनी माझ्या शहीद झालेल्या वडिलांचा अपमान केला आहे. अमेठीतील जनता त्यांना कधीच माफ करणार नाहीत. त्यांच्या नीच राजकारणाला अमेठीतील कॉंग्रेसचे कार्यकर्तेच उत्तर देतील. अमेठीतील एका एका बूथवरून त्यांना उत्तर देण्यात येईल. असे प्रियांका गांधी यांनी म्हटले होते. त्यालाच मोदींनी मंगळवारी सकाळी प्रत्युत्तर दिले. खालच्या जातीतून आल्यामुळेच त्यांना माझे राजकारण नीच दर्जाचे असल्याचे वाटते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2014 11:11 am

Web Title: narendra modi hits out at priyanka gandhi
Next Stories
1 अमेठीत सोमनाथ भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल
2 मोदी पंतप्रधान झाल्यास भारत-चीन संबंध दृढ होतील- चीनमधील दैनिकाचे मत
3 अमित शहा दहशतवादी- लालूप्रसाद यादव
Just Now!
X