04 August 2020

News Flash

गरीबी समजून घेण्यासाठी मला पुस्तके वाचण्याची गरज नाही – नरेंद्र मोदी

मला गरीबी समजून घेण्यासाठी पुस्तके वाचण्याची गरज नाही. मी गरीबीमध्ये दिवस काढले आहेत. समाजाच्या मागास वर्गातून येणं आणि गरीबी म्हणजे काय ? हे मला चांगले

नरेंद्र मोदी

मला गरीबी समजून घेण्यासाठी पुस्तके वाचण्याची गरज नाही. मी गरीबीमध्ये दिवस काढले आहेत. समाजाच्या मागास वर्गातून येणं आणि गरीबी म्हणजे काय ? हे मला चांगले माहित आहे. त्यामुळेच मला समाजातील गरीब, कमकुवत घटकांसाठी काम करायचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘भारत की बात सबके साथ’ या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

देशातील १८ हजार गावे वीजेच्या प्राथमिक सुविधेपासून वंचित आहेत. अजूनही अनेक महिलांसाठी प्रसाधनगृहांची व्यवस्था झालेली नाही. आपल्या देशातील हे वास्तव मला झोपू देत नाही. गरीबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा माझा निर्धार पक्का आहे असे मोदी म्हणाले.

लोकशाहीमध्ये लोक देवासमान असतात. त्यांनी ठरवलं तर चहाविक्रेत्याला रॉयल पॅलेसमध्ये हस्तांदोलनाची संधी मिळू शकते असे मोदी म्हणाले. माणसाने अधीर असण यात काहीही चुकीच नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तिकडे सायकल असते तेव्हा तो स्कूटरची महत्वकांक्षा बाळगतो. स्कूटर आली कि, गाडीची महत्वकांक्षा निर्माण होते. भारत हा वेगाने महत्वकांक्षी देश बनत चालला आहे असे मोदी म्हणाले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2018 4:07 am

Web Title: narendra modi in london
टॅग Narendra Modi
Next Stories
1 काँग्रेस, भाजपने नाकारलेले जनता दलाकडे
2 ब्रेग्झिटोत्तर संबंधांसाठी भारत-ब्रिटन सज्ज
3 VIDEO: हे आहे मोदींच्या फिटनेसचे रहस्य, दररोज एक ते दोन किलो ‘हा’ पदार्थ खातात
Just Now!
X