पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिटनच्या दौ-यावर आहेत. लंडनहून  ‘भारत की बात, सबके साथ’ या कार्यक्रमात ते सहभागी झाले असून भारतीय समुदायाच्या नागरिकांना मोदी येथे संबोधित करत आहेत.  ऐतिहासिक टाऊन हॉल येथे हा कार्यक्रम होत आहे. येथे पंतप्रधान मोदींना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. जवळपास 2 हजार जणांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली असून, या कार्यक्रमाचं संचालन प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी करत आहे.

LIVE अपडेट्स –

  • कोणावर ओझं व्हावं अशी माझी इच्छा नाही, हसत-खेळत जगाचा निरोप घेण्याची इच्छा- मोदी
  • पाकिस्तानवर मोदींचा हल्लाबोल, जर कुणी दहशतवादाचा वापर करत असेल, त्याच्यात युद्ध करण्याची शक्ती नसेल आणि पाठीवर वार करत असेल, तर त्यांच्याच भाषेत कसं उत्तर द्यायचं हे मला माहितीये –  मोदी
  • वाढत्या बलात्कारांच्या घटनेवर मोदी म्हणाले, अल्पवयीन मुलींवरील बलात्कार चिंतेचा विषय, कोणत्या सरकारमध्ये बलात्कार झाला हे महत्त्वाचं नाही, बलात्कार हा बलात्कार असतो. मुलींना प्रश्न विचारण्याऐवजी समाजाने मुलांना प्रश्न विचारावे- मोदी
  • मला पुस्तकं वाचून गरिबी काय असते हे शिकावं लागत नाही – मोदी
  • आपल्यासमोर लाखो समस्या असतील पण त्या सोडवायला अब्जावधी पर्याय देखील आहेत – मोदी
  • आमची इमानदारी बघा की सर्जिकल स्ट्राइकची माहिती आम्ही पाकिस्तानला आधी दिली त्यानंतर माध्यमांना याबाबत माहिती देण्यात आली. मी अधिका-यांना सांगितलं होतं की मीडियाला समजण्याआधी पाकिस्तानला याबाबत माहिती द्या – मोदी
  • भारताकडे सर्जिकल स्ट्राइकचा हजारो वर्षे जुना इतिहास आहे – मोदी
  • भारताने कधीही इतरांच्या भूभागावर डोळा ठेवला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आमचा काहीही फायदा नसताना आमच्या सैनिकांनी युद्धात भाग घेतला, हा त्याग होता –  मोदी
  • मी चुका करु शकतो, पण माझा उद्देश कधी चुकीचा नसेल – मोदी
  • ११ कोटी लोकांनी पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेतला आहे, लोकांना विनाहमी पैसे मिळत आहेत – मोदी
  • लोकं माझ्यावर दगड फेकतात, पण मी त्यांचाच वापर करुन रस्ता तयार करतो – मोदी
  • 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे काम केले  – मोदी
  • जनतेने ठरवलं तर चहावालाही पंतप्रधान बनू शकतो – मोदी
  • लोकशाहीमध्ये जनताच सर्वस्व आहे. जनतेने एकदा ठरवलं तर सगळं बदलू शकतं. कारण भारतात जी जागा एका कुटुंबासाठी सुरक्षित होती, त्याला जनतेनेच बदललं – मोदी.
  • रात्री झोपताना मी उद्याचं स्वप्न पाहतो – मोदी
  • प्रश्न – देशाच्या विकासाबाबत देशवासियांमध्ये अधिरता आहे, याबाबत काय बोलाल.
  • उत्तर – अधिरता तरुणाईची ओळख आहे. मला यामध्ये काहीही चुकीचं वाटत नाही. देशवासियांचा विश्वास आहे म्हणूनच त्यांना अपेक्षा आहेत.