मध्य प्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी एक हैराण करणारं विधान केलं आहे. हरदा जिल्ह्यातील टिमरनी येथील आंगणवाडीच्या एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी अविवाहीत आहेत, असं त्या म्हणाल्या. महिला आणि मुलांच्या समस्यांबाबत बोलताना त्यांनी हे विधान केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या म्हणाल्या, ‘सर्व जगाला माहितीये….तुमच्या मुलांसाठी….तुमच्यासाठी…त्यांनी लग्न केलं नाहीये…हे माहितीये ना तुम्हाला….नरेंद्र भाईंनी लग्न केलं नाहीये…पण महिलांना प्रसुतीच्या वेळी आणि प्रसुतीनंतर किती त्रास होतो याची त्यांना कल्पना आहे…म्हणून त्यांनी महिलांसाठी एवढ्या योजना काढल्या’. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आनंदीबेन यांचं हे विधान १७ जून रोजीचं आहे. मोदींच्या जवळच्या व्यक्ती म्हणूनही आनंदीबेन पटेल यांची ओळख आहे. नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात आल्यानंतर आनंदीबेन पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकांच्या काही महिन्यांपूर्वी त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर मध्य प्रदेशच्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीवेळी वाराणसीमध्ये नामांकन भरताना शपथपत्रात विवाहीत असून पत्नीचं नाव जशोदाबेन असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. पाहुया काय म्हणाल्या आनंदीबेन पटेल.

पाहा व्हिडीओ –

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi is unmarried says madhya pradeshs governor anandiben patel
First published on: 20-06-2018 at 11:19 IST