News Flash

बहुत बढिया! म्हणत मोदींनी केले लोककलाकारांचे कौतुक; लाखो लोकांनी केले लाईक

लोकगीताचा हा भावपूर्ण विडियो भरपूर व्हायरल झाला आहे

छायाचित्र सौजन्य: इंडियन एक्सप्रेस

देशात प्रतिभावान कलाकारांची कमतरता नाही आणि सोशल मीडियाच्या निमित्ताने अशा प्रकारच्या मान्यता न मिळालेल्या कलागुणांकडे आता लोकांचे लक्ष वेधले जात आहे. नुकतेच असे काही लोककलाकारांच्या जोडीसोबत घडले. त्यांनी आपल्या गाण्याने केवळ सर्वांनाच मंत्रमुग्ध केले तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुकही मिळवले.

ब्रिजेश चौधरी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन पुरुष रस्त्यावर भक्तिगीत गाताना दिसत आहेत. त्यातील एक राजस्थानी तंतुवाद्य रावणहठ वाजवताना दिसत आहे, तर दुसरा त्याच्या साथीने डफ वाजवित आहे.

या विडीयो क्लिप शेअर करणार्‍या ट्विटर युजरने लिहिले आहे की, ही भावना ऐका आणि अनुभवा. या अस्सल प्रतिभेसमोर सर्व सेलिब्रिटी ‘अपयशी’ असल्याचा दावा करत सर्वांना “स्थानिक प्रतिभेचे समर्थन व प्रोत्साहन” देण्याचे आवाहन केले आहे.

लोकगीताचा हा भावपूर्ण विडियो भरपूर व्हायरल झाला. याकडे पंतप्रधान मोदींचेही लक्ष गेले. महा शिवरात्रीच्या अगोदर पंतप्रधानांनी गाण्याचे क्लिप रीट्वीट करुन भगवान शिवची स्तुती केली आणि “बहुत बढिया (खुपच छान)” असे म्हणत या कुशल जोडीचे कौतुक देखील केले: त्याचे ट्विट आणल्यानंतर या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि अनेकांनी या जोडीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 5:15 pm

Web Title: narendra modi lauds folk artistes singing devotional song sbi 84
Next Stories
1 गूगल डूडलने केला ‘भारताच्या सॅटेलाईट मॅन’चा सन्मान
2 विचित्र! विमानात वारंवार कपडे काढत होती महिला, अखेर कर्मचाऱ्यांनी दोरीने बांधले हात-पाय
3 मैत्रिणीने लव्ह प्रपोजल स्वीकारण्यासाठी मदत मागणाऱ्या तरुणाला पुणे पोलीस आयुक्तांनी दिलं उत्तर; म्हणाले…
Just Now!
X