अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नी मेलनिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाइट हाऊसमध्ये स्वागत करणार आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून शनिवारी रात्री वॉशिंग्टन डीसीमध्ये येऊन पोहचलेले मोदी यांचा व्हाइट हाऊसमध्ये ४ तासांहून अधिक वेळ घालवण्याचा कार्यक्रम आहे.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
vina vijayan ed case
मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर ईडीची कारवाई; केरळमध्ये काय घडतंय?

ट्रम्प दांपत्याने व्हाइट हाऊसच्या साऊथ पोर्टिकोमध्ये मोदी यांचे स्वागत केल्यानंतर दोन्ही नेते ओव्हल ऑफिसमध्ये एकमेकांशी समोरासमोर चर्चा करतील. मोदी यांची अमेरिकेच्या अध्यक्षांसोबतची ही तिसरी भेट असेल. यापूर्वीचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी ते सप्टेंबर २०१४ आणि जून २०१६ मध्ये भेटले होते.

यानंतर या दोन्ही नेत्यांची त्यांच्या संबंधित प्रतिनिधी मंडळांसह लगतच्या कॅबिनेट रूममध्ये बोलणी होतील. अमेरिकेतर्फे उपाध्यक्ष माइक पेन्स, संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस, परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल ए.आर. मॅकमास्टर हे बोलण्यांमध्ये भाग घेण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधानांसोबत भारताच्यावतीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत नवतेज सरना बोलण्यांत सहभागी होतील. त्यानंतर मोदी व ट्रम्प हे रोझ गार्डन येथे प्रसारमाध्यमांसमोर संयुक्त निवेदन करतील.