News Flash

…म्हणून मोदींच्या जय्यत तयारीनंतरही ट्रम्प भारत दौऱ्यात आवडत्या पदार्थाला मुकणार

दोन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान मोदी आणि ट्रम्प अनेकदा एकत्रच भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. मात्र...

Trump In India

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रविवारी ते अमेरिकेमधून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत. ट्रम्प यांनीच त्यांच्या ट्विटरवरुन व्हाइट हाऊससमोरून हॅलिकॉप्टरमधून उड्डाण करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी दिल्ली आणि अहमदाबादमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. याच वर्षाच्या शेवटी अमेरिकेत असणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा ट्रम्प यांच्यासाठी अंत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामध्ये ट्रम्प एक गोष्ट पहिल्यांदाच करणार आहेत. ती गोष्ट म्हणजे परदेश दौऱ्यात बीफ न खाणे.

ट्रम्प यांची आवड…

ट्रम्प सौदी अरेबिया दौऱ्यावर असो किंवा इतर देशांच्या दौऱ्यावर ते आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत नाहीत. त्यामुळेच परदेशात असले तरी त्यांना अमेरिकन खाण्याचा आस्वाद घेता येतो. ट्रम्प यांना टोमॅटो केचअपबरोबर बीफ बर्गर खायला प्रचंड आवडते. ते जिथे जिथे जातात तिथे बीफ बर्गरची आधीच तयारी करुन ठेवण्यात येते. मात्र भारत दौऱ्यात असं होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान ठरवण्यात आलेल्या मेन्यूमध्ये बीफचा समावेश करण्यात आलेले नाही. सीएनएन या अमेरिकन वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्यासाठी शाकाहारी खाण्याची व्यवस्था केली आहे.

…म्हणून खाता येणार नाही आवडता पदार्थ

सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प गुजरातमधील अहमदाबादबरोबरच आग्रा आणि दिल्लीत जाणार आहेत. या शहरांमध्ये हिंदूंची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहेत. येथील हिंदू गायीची पुजा करतात. भारतात काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मांसांहार करणे योग्य मानलं जात नाही असंही ट्रम्प यांच्या दौऱ्याचे नियोजन करणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांचा लक्षात आल्याने मांसांहार टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. मोदींनी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानामध्ये ट्रम्प यांच्यासाठी ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मोदी स्वत: शाकाहारी आहेत, त्यामुळेच ट्रम्प यांना भारत दौऱ्यात शाकाहारी पदार्थ खावे लागणार आहेत.

याच पदार्थावर मानावं लागणार समाधान

ट्रम्प यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये मोदी आणि ट्रम्प अनेकदा एकत्रच भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. मंगळवारी राष्ट्रपती भवनामध्ये दोन्ही नेते दुपारचे आणि रात्रीचे जेवण एकत्रच घेतील. ट्रम्प आणि मोदी यांनी याआधीही एकत्र भोजन केलं आहे. ट्रम्प यांना सॅलेड खूप आवडं. मात्र सॅलेड वगळता ट्रम्प मांसांहारी जेवणालाच प्राधान्य देताना दिसतात असं वृत्तामध्ये म्हटलं आहे. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदा भारतात येणार आहेत. मात्र ट्रम्प यांची सर्वाधिक संपत्ती अमेरिकेनंतर भारतातच आहे. त्यामुळे याआधी एक व्यवसायिक म्हणून ते अनेकदा भारतात येऊन गेले आहेत. असं असलं तरी यंदाचा दौरा राजकीय संबंध दृढ करण्यासाठी असल्याने स्थानिकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी ट्रम्प यांना त्यांचा आवडता पदार्थ म्हणजेच बीफ बर्गर खाता येणार नाही. म्हणूनच ट्रम्प यांना कोणते शाकाहारी पदार्थ आवडतील यासंदर्भातील अभ्यास करुन तशाप्रकारचा मेन्यू तयार करण्यात आल्याचे समजते. “मॅकडोनाल्डही भारतामध्ये बीफ बर्गर विकत नाही. त्यामुळे या दौऱ्यात ट्रम्प यांना चीज बर्गरच खावे लागणार आहे,” असं मत ट्रम्प प्रशासनातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 8:47 am

Web Title: narendra modi menu for donald trump includes all vegetarian food no beef scsg 91
Next Stories
1 असा असेल ट्रम्प यांचा 36 तासांचा भारत दौरा
2 Namaste Trump : ट्रम्प दाम्पत्याची ताजमहलला, डायना बेंचवर बसून फोटोसेशन
3 समर्थक-विरोधकांची एकमेकांवर दगडफेक
Just Now!
X