सोशल मीडिया हे सध्या सर्वांसाठीच चर्चेचा विषय झाले आहे. मग यामध्ये देशाचे पंतप्रधानही मागे नाहीत. आपले फॉलोअर आणि त्यांच्याकडून मिळणारे प्रेम हे नामवंत व्यक्तीच्या प्रसिद्धीसाठी महत्त्वाचा विषय असतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, भारताचे प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष मतांबरोबरच फेसबुकवरही चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. आता ही गोष्ट ठिक आहे, पण मोदींचा प्रभाव इतका जास्त आहे की त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकले आहे. मोदी हे जगभरातील सर्वाधिक पसंती असलेले नेते असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ४.३२ कोटी आहे. ही संख्या ट्रम्प यांच्या २.३१ कोटी या संख्येपेक्षा जवळपास दुप्पट आहे.

आता असे असले तरीही ट्रम्प फेसबुकही जास्त प्रमाणात वापर करतात. त्यांना मागच्या १४ महिन्यात आपल्या अकाऊंटवर २०.४९ कोटी कमेंटस, लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. तर मोदींना ११.३६ कोटी कमेंटस, लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांची संख्या जास्त असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. ट्रम्प दिवसभरात फेसबुकवर एकूण ५ पोस्ट करतात. हे प्रमाणही मोदींच्या पोस्टपेक्षा जवळपास दुप्पट आहे. जगातील अनेक नेते आपली सोशल अकाऊंटस कोणत्याही सोशल मीडिया टीमला न देता स्वत: हँडल करतात असेही म्हटले आहे.

असे असले तरीही ट्विटरवर मात्र सुरुवातीपासून ट्रम्प यांचे फॉलोअर्स जास्त आहेत. आशिया खंडात मागच्या काही काळात फेसबुकचा वापर वाढला असून याठिकाणी ट्विटर कमी प्रमाणात वापरले जात जाते, असेही या अभ्यासात म्हटले आहे. या अभ्यासासाठी २०१७ पासून सत्तेत असलेल्या जगभरातील ६५० व्यक्ती आणि संस्थांच्या फेसबुक पेजचा अभ्यास करण्यात आला आहे. कंबोडियाचे पंतप्रधान हून सेन शॉट हे पाचव्या स्थानावर असल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे. तर न्यूझिलंडच्या जसिंडा अर्डन या सर्वाधिक आवडीच्या पंतप्रधान म्हणून ओळखल्या जातात. त्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन लाईव्ह राहण्याचा प्रयत्न करतात.