27 September 2020

News Flash

नरेंद्र मोदींकडून ट्विटरच्या माध्यमातून बाळासाहेबांना श्रद्धांजली

सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी बाळासाहेब ठाकरे कटिबद्ध होते - नरेंद्र मोदी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ट्विटरवर मंगळवारी सकाळी केलेल्या ट्विटमध्ये मोदी यांनी म्हटले आहे की, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी बाळासाहेब ठाकरे कटिबद्ध होते. अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल आदर होता. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.


मुंबईतील शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावरही हजारो शिवसैनिकांनी मंगळवारी सकाळपासूनच बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब येऊन या ठिकाणी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. शिवसेनेचे नेते, उपनेते, खासदार, आमदार, वेगवेगळ्या ठिकाणचे नगरसेवक यावेळी स्मृतिस्थळावर उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2015 11:34 am

Web Title: narendra modi pays tribute to balasaheb thackeray
Next Stories
1 वाघा बॉर्डरवरील सुरक्षा भेदण्याचा अनिवासी भारतीयाचा प्रयत्न
2 तामिळनाडूत पावसाचा जोर कायम; ७१ मृत्युमुखी
3 आयसिसविरोधात फ्रान्स आक्रमक!
Just Now!
X