News Flash

नरेंद्र मोदींचे भाषण लाईव्‍ह ऐकण्‍यासाठी डायल करा हा नंबर

पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे आज (रविवार) हरियाणा येथील रेवाडीमध्‍ये माजी सैनिकांच्‍या रॅलीला संबोधित करणार आहेत.

| September 15, 2013 12:37 pm

पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे आज (रविवार) हरियाणा येथील रेवाडीमध्‍ये माजी सैनिकांच्‍या रॅलीला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान पदाचे उमेदवार बनल्‍यानंतर मोदींची ही पहिलीच रॅली असणार आहे. त्यामुले मोदींचे भाषण लाईव्‍ह ऐकण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. भाषण सुरू झाल्‍यानंतर  आपल्‍या मोबाईलवरून ०२२४५०१४५०१ वर डायल करून भाषण ऐकू शकता. या रॅलीत मोदी राष्‍ट्रीय सुरक्षा आणि माजी सैनिकांना निवृत्तीनंतर नोकरी मिळवण्‍यासाठी होणा-या अडचणींसहित इतर मुद्यांवर बोलतील.
मोदींच्‍या या सभेला दीड लाखांपेक्षा अधिक लोक सहभागी होण्‍याा दावा भाजपाने केला आहे. रेवाडीच्‍या सचिवालय मैदानात होणा-या या रॅलीमध्‍ये बहुतांश माजी सैनिक असतील.  या रॅलीत मंचावर निवृत्त मेजर जनरल व्‍ही. के. सिंहही उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 12:37 pm

Web Title: narendra modi rally after being pm candidate of bjp nda
टॅग : Nda
Next Stories
1 काळे झेंडे दाखवून अखिलेश यादवांचे स्वागत!
2 ‘राजकीय दबावाखाली आरोपींना शिक्षा ठोठाविण्यात आलेली नाही’
3 पंतप्रधान सोमवारी मुझफ्फरनगरमध्ये
Just Now!
X