गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज(बुधवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, आनंदीबेन पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचे राजीनामा देणे गरजेचे होते. मोदींनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पक्षाने(भाजप) आनंदीबेन पटेल यांची निवड केली. त्यांच्या माध्यमातून गुजरातला यावेळी पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत.
आनंदीबेन पटेलांचे पती ‘आप’मध्ये!
गेली १३ वर्षे यशस्वीरित्या गुजरातचे मुख्यमंत्रपद भूषविणाऱया नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल कमला बेनिवाल यांच्याकडे सुपूर्त केला. त्याआधी गुजरातच्या विधानसभेत नरेंद्र मोदींचे निरोपाचे भाषणही झाले. गुजरात विधानसभेला अलविदा करणाऱया नरेंद्र मोदींचे यावेळी विरोधी नेत्यांसह पक्षातील सर्व आमदारांनी विधानसभेत तोंडभरून कौतुक केले. यात आमदार आनंदीबेन पटेल यांनी गुजरातचा पुत्र आज देशाचा पंतप्रधान होत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले.