26 February 2021

News Flash

मी माझ्या मर्यादेत राहणं तुमच्यासाठी चांगलं, नरेंद्र मोदींचं काँग्रेसला उत्तर

BC म्हणजे बिफोर काँग्रेस आणि AD आफ्टर डायनेस्टी असा टोलाही नरेंद्र मोदींनी यावेळी लगावला

मी माझ्या मर्यादेत राहणं तुमच्यासाठी चांगलं आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांना सुनावलं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर नरेंद्र मोदींनी आभार प्रस्ताव मांडला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली. BC म्हणजे बिफोर काँग्रेस आणि AD आफ्टर डायनेस्टी असा टोलाही नरेंद्र मोदींनी यावेळी लगावला.

लोकसभेत 1947 पासूनच्या गोष्टी सांगण्यात आल्या. पण काँग्रेसला वर्ष कळत नाही. त्यांच्या मते BC म्हणजे बिफोर काँग्रेस आणि AD आफ्टर डायनेस्टी. त्यांचं म्हणणंही बरोबर आहे काँग्रेसच्या आधी काहीच नव्हतं आणि जे काही देशाचं झालं आहे ते त्यांच्यामुळेच झालं आहे असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला.

हे सरकार पारदर्शक म्हणून ओळखलं जातं. गरिबांसाठी झटणांर, राष्ट्रहिताला प्राथमिकता देणार, भ्रष्टाचारावर कारवाई करणारं तसंच वेगाने काम करणारं म्हणून ओळखलं जातं असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. संसदेत चर्चेचा प्रयत्न झाला आहे. काही टीकादेखील झाली…काहीजणांनी जे आवडतं ते वारंवार बोलून दाखवलं. निवडणूक असल्याने काही ना काहीतरी बोलावं लागतंच. नाईलाज असणं साहजिक आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी लोकसभेसाठी पहिल्यांदाच मतदान कऱणाऱ्यांना शुभेच्छा देत नवीन पिढी देशाला नवी दिशा देण्यात महत्वाची भूमिका निभावेल असं सांगितलं. नरेंद्र मोदींनी यावेळी आपल्या सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत सरकारने मिळवलेलं यश सांगितलं. साडे चार वर्षात काय होतं आणि आपण कुठे पोहोचलो आहेत याची तुलना होणार. अर्थव्यवस्था 10,11 व्या क्रमांकावरुन सहाव्या क्रमांकावर पोहोचली. 11 क्रमांकावर पोहोचल्याचा ज्यांना अभिमान होता त्यांना सहाव्या क्रमांकावर आल्याचा अभिमान का नाही ? असा सवाल यावेळी नरेंद्र मोदींनी विचारला.

अनेक क्षेत्रांमध्ये भारत अग्रेसर असल्याचं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. आम्ही जगाला मेक इन इंडियाची ताकद दाखवली. भारत हा जगातला दूसरा सर्वात मोठा स्टील निर्मिती करणारा देश झाला. भारत आता जगातला चौथा सर्वात मोठा ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर झाला आहे. मेक इन इंडियामुळे जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट भारतात उपलब्ध आहे. इंटरनेटचा सर्वाधिक वापर भारतात केला जात आहे अशी माहिती यावेळी नरेंद्र मोदींनी दिली.

नरेंद्र मोदी आणि सरकारच्या धोरणांवर टीका झालीच पाहिजे. पण मोदी, भाजपावर टीका करता करताना देशाबद्दल वाईट बोलू नका असं यावेळी नरेंद्र मोदींनी विरोधकांना सांगितलं. लंडनमध्ये जाऊन खोटी पत्रकार परिषद करण्यात आली अशी टीका यावेळी नरेंद्र मोदींनी केली.

काँग्रेस देशातल्या न्यायसंस्थेला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेकडून महाभियोगाची धमकी दिली जाते, योजना आयोगाला प्राणी कमिशन म्हटले जाते. काँग्रेसने लष्कर प्रमुखांना गुंडांची उपमा दिली असं सांगत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. तुम्ही भारतीय लष्कराच्या मनाला ठेस पोहोचवली आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. आपला निवडणूक आयोग जगासाठी उत्तम उदाहरण आहे आहे, त्यामुळे निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायला हवा असं आवाहन यावेळी विरोधकांना करण्यात आलं.

जेव्हा महाभेसळ असलेलं सरकार असते तेव्हा देशाची अधोगती होते असं सांगत नरेंद्र मोदींनी महागंठबधनवर टीका केली. आमचं सरकार बहुमत असलेलं सरकार आहे, त्यामुळे आमचे सरकार देशवासियांसाठी आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. काँग्रेस प्रत्येक निवडणुकांच्या वेळी एकच जाहीरमाना प्रसिद्ध करत आलं आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेली वचनं आमचं सरकार आल्यावर आम्ही पूर्ण केली असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

नरेंद्र मोदींनी विजय मल्ल्याचं नाव न घेता घोटाळा करुन पळून गेलेले ट्विटरवर रडत आहेत असं सांगत विरोधकांना उत्तर दिलं. असा कायदा आम्ही केला. तुम्ही लुटत आहेत त्यांना लुटू दिलंत असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.

देश बजेटवर चर्चा करत असताना हे ईव्हीएमवर चर्चा करत होते. एवढे का घाबरले आहात…काय झालंय तुम्हाला असा सवाल नरेंद्र मोदींनी यावेळी काँग्रेसला विचारला. तुमची 55 वर्ष आणि माझे फक्त 55 महिने. मोदींकडे बोट करण्यापूर्वी आपला भूतकाळ तपासा असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

देशाची वायुसेना दुबळी व्हावी ही काँग्रेसची इच्छा असल्याचा गंभीर आरोप यावेळी नरेंद्र मोदींनी केला. काँग्रेसने जवानांना कमजोर केलं असंही ते म्हणाले. काँग्रेस सरकारने आपल्या सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट, चांगले हेल्मेट, चांगले बूटदेखील दिले नाहीत. 2016 साली आम्ही सैनिकांसाठी 50 हजार आणि 2017 मध्ये 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केले अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.

– काँग्रेसमुक्त भारत व्हावा ही तर गांधीजींची इच्छा, मी फक्त त्यांचं स्वप्न पूर्ण करत आहे
– जर गांधीजींचे भक्त असाल तर त्यांची इच्छा पूर्ण करा
– काँग्रेसमध्ये सामील होणं आत्महत्या करण्यासारखं आहे…असं आंबेडकर म्हणाले होते
– नोटबंदीमुळे बेनामी कंपन्यांचा पर्दाफाश झाला
– 3 लाख बेनामी कंपन्या बंद पडल्या
– बेनामी संत्तीची प्रकरणं समोर आली, अजूनही अशी प्रकरणं समोर येत आहेत
– जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत होतं तेव्हा महागाई होती , परंतु गेल्या साडेचार वर्षांपासून महागाईचा दर केवळ 4 टक्के आहे
– दुधावर कर लावणाऱ्या काँग्रेसने जीएसटीबाबत बोलू नये
– जीएसटीमुळे अत्यावश्यक वस्तू करांच्या बाहेर गेल्या आहेत, 99 टक्के वस्तूंवर 18 टक्यांपेक्षा कमी जीएसटी आहे

– आम्ही देशातल्या 10 टक्के गरिबांना आरक्षण दिलं. गरिबांना आरक्षण देण्याची हिंमत दाखवली

– लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत निवडणूक जिंकता, काँग्रेसला टोला
– 2009 मध्ये कर्जमाफी करण्याचं आश्वासन दाखवत सत्ता मिळवली होती

– 99 योजना बारगळत पडल्या होत्या. आम्ही त्यांचं काम पूर्ण केलं.

– काही राज्यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पैसे घेणार नाही असं घोषणा केली…आधी त्या शेतकऱ्यांनाही विचारा

– 2023 मध्ये तुम्हाला पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणण्याची संधी मिळो

– हा अहंकाराचा प्रभाव आहे की काँग्रेस 400 हन 40 वर आले आणि सेवभावाचा प्रभाव म्हणून आम्ही 2 हून 200 वर आलो
– देश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच, ज्यांनी देशाला लुटलं आहे त्यांना घाबरावंच लागेल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 6:26 pm

Web Title: narendra modi targets congress in lok sabha
Next Stories
1 टाटा मोटर्सला तिमाहीत २७००० कोटींचा तोटा, JLR ची सुमार कामगिरी
2 धक्कादायक ! वडिलांना झाडाला बांधून त्यांच्यासमोरच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
3 ‘माझ्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय तुम्ही घ्या आणि लाखो कमावा’, तिची अजब ऑफर
Just Now!
X