News Flash

दांडी यात्रेच्या पुनर्रचनेला पंतप्रधान दाखवणार झेंडा

८१ पादचारी साबरमती आश्रमापासून ३८६ कि.मी. अंतरावर असलेल्या दांडी या ठिकाणी जातील

(संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महात्मा गांधींच्या ऐतिहासिक दांडी यात्रेच्या पुनर्रचनेला झेंडा दाखवणार आहेत. अहमदाबादच्या साबरमती आश्रमातून यात्रेला सुरूवात होणार आहे.  या यात्रेत सहभागी होणारे प्रतिनिधी दांडी यात्रेच्या ३८६ किलोमीटरच्या मूळ मार्गावरुन यात्रा करणार आहेत. हा मार्ग साबरमती आश्रम ते दक्षिण गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडीपर्यंत आहे.

राज्यशासनाच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवताना, गुजरातच्या मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ही घोषणा केली. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा अमृत महोत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्याच्या विचार विनिमयाबद्दल ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

सायकल आणि बाईक रॅली, विविध स्पर्धा, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘आत्मानिर्भर भारत’ या विषयांवर कार्यक्रम आयोजित करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यामागचे उद्दीष्ट म्हणजे मुले, तरुण आणि नागरिकांचा यात जास्तीत जास्त सहभाग होणे आणि महात्मा गांधींचा संदेश पोहोचविणे हा आहे.
१२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती गांधी आश्रमातून ऐतिहासिक दांडी यात्रेच्या पुनर्रचनेला झेंडा दाखवणार आहेत. यात ८१ पादचारी साबरमती आश्रमापासून ३८६ कि.मी. अंतरावर असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणी जातील.

श्री रुपाणी म्हणाले की, यात सहभागी होणारे पादचारी त्यांच्या मार्गावर २१ ठिकाणी थांबतील आणि विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. यामध्ये स्वच्छता, पर्यावरण, सुरक्षा आणि जलसंधारणाच्या क्षेत्रात होणार्‍या सामाजिक-आर्थिक बदलांचा समावेश आहे. २५ वर्षांनतर भारत आपल्या स्वतंत्र्याचे १००वे वर्ष साजरे करणार आहे. हे कार्यक्रम भारताच्या विश्वगुरू होण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 1:25 pm

Web Title: narendra modi to flag off reenact of mahatma gandhis historic dandi march sbi 84
Next Stories
1 गूगल डूडलने केला ‘भारताच्या सॅटेलाईट मॅन’चा सन्मान
2 तीरथ रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री; भाजपाच्या बैठकीत निर्णय
3 मुख्यमंत्री पदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत
Just Now!
X