न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुढील आठवडय़ात संयुक्त राष्ट्रांत दोन भाषणे होणार असून पहिले भाषण संयुक्त राष्ट्रांच्या पंचाहत्तरीनिमित्त आहे, तर दुसरे भाषण आमसभेत होणार आहे. आभासी पद्धतीने ही भाषणे होतील. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे अस्थायी सदस्यत्व मिळाल्याने या वेळी मोदी यांच्या भाषणाला विशेष महत्त्व असल्याचे संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टी.एस.तिरुमूर्ती यांनी सांगितले.  संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेची उच्चस्तरीय बैठक पंचाहत्तरीनिमित्त २१ सप्टेंबरला सुरू होत आहे.  या ऐतिहासिक प्रसंगी सदस्य देश एक दूरदर्शी राजकीय जाहीरनामा मंजूर करणार आहेत.