News Flash

मार्गभ्रष्ट तरुणांनी उचललेला प्रत्येक दगड हा काश्मीरच्या स्थैर्यावर आघात

जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यात मोदींचे प्रतिपादन

जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यात मोदींचे प्रतिपादन

दिशाभूल झालेल्या तरुणांनी उचललेला प्रत्येक दगड किंवा शस्त्र हा जम्मू-काश्मीरच्या स्थैर्यावरील आघात आहे. तरुणांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून राष्ट्रीय मुख्य प्रवाहात येणे हेच हितावह आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राज्याच्या दौऱ्यात केले.

मोदी यांच्या हस्ते शनिवारी राज्यातील ३३० मेगावॅट क्षमतेच्या किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्याच्या प्रगतीवर थेट पंतप्रधान कार्यालयातून लक्ष ठेवले जात होते. तसेच शेर-ए-कश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे श्रीनगर रिंग रोड (बाह्य़वळण रस्ता) प्रकल्पाची कोनशिला ठेवली. श्रीनगर शहराला वळसा घालून जाणारा हा ४२.१ किमी लांबीचा रस्ता पश्चिमेकडील गलंदर आणि बंदिपुरा जिल्ह्यातील सुंबल या ठिकाणांना जोडणार असून त्याने वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या दौऱ्यात मोदी राज्याच्या जम्मू, काश्मीर आणि लडाख या तिन्ही प्रदेशांना भेट देत आहेत. मोदींनी झोझिला बोगद्याच्या बांधकामाचीही कोनशिला ठेवली. हा बोगदा काश्मीर खोरे आणि लडाख या प्रदेशांना जोडणार आहे. सध्या हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे दोन्ही प्रदेशांचा संपर्क तुटतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 12:49 am

Web Title: narendra modi visit to jammu and kashmir 2
Next Stories
1 आता कुमारस्वामी त्यावेळी शिवकुमार विलासराव देशमुख सरकारसाठी ठरले होते संकटमोचक
2 VIDEO – वजुभाई वाला म्हणजे निष्ठावान कुत्रा – संजय निरुपम
3 कुमारस्वामींच्या शपथविधीचा दिवस बदलला, या दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
Just Now!
X