पीएमओकार्यालयाची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ तास कार्यरत असून त्यांनी पदाची शपथ घेतल्यापासून एकदाही रजा घेतली नसल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने माहिती अधिकारांतर्गत करण्यात आलेल्या अर्जदाराला दिली आहे.

BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश
election commission arrest cm
केजरीवाल, लालू ते जयललिता; आतापर्यंत ‘या’ ५ मुख्यमंत्र्यांना ईडीकडून अटक

देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय सचिवांना रजा मंजूर करण्याबाबत नियमांची माहिती याचिकाकर्त्यांने मागविली होती. पंतप्रधान २४ तास कार्यरत असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्त्यांने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, एच.डी. देवेगौडा, आय.के. गुजराल, पी.व्ही. नरसिंहराव, चंद्रशेखर, व्ही.पी. सिंग आणि राजीव गांधी यांच्या रजांचा तपशीलही मागविला होता. माजी पंतप्रधानांच्या रजांची माहिती कार्यालयाकडे उपलब्ध नसून सध्याच्या पंतप्रधानांनी एकही रजा घेतली नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले.

माजी पंतप्रधानांच्या रजांची माहिती देण्यात पंतप्रधान कार्यालयाने असमर्थता दर्शविली असून त्यासंबंधी अर्जदाराचा अर्ज गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.