नासाच्या कॅमेऱ्यामध्ये काही दिवसांपूर्वी परग्रहवासी पृथ्वी सोडून जात असल्यासारख्या प्रतिमा कैद झाल्या आहेत. पृथ्वीची छायाचित्रे घेणाऱ्या उच्च लहरींच्या कॅमेऱ्याने या हालचाली टिपल्या आहेत. यानंतर काही काळासाठी नासाचे प्रसारण बंद करण्यात आले होते.
नासाच्या अंवकाश संशोधन केंद्राच्या कॅमेऱ्याने ही प्रतिमा टिपली आहे. यावेळी काही प्रकाशीय वस्तू पृथ्वीवरून अवकाशात जात असल्याचे दिसत होते. यानंतर काही वेळाने नासाचा कॅमेरा दिवसबर बंद पडत होता. तसेच संदेशांची देवाणघेवाणही मंदावल्याचे नासाने म्हटले आहे.
दरम्यान, डब्लिन, आर्यलडच्या आकाशात मंगळवारी सकाळी यूएफओ ्अर्थात उडत्या तबकडय़ांसदृश ढग दिसल्याने परग्रहवासी आल्याच्या भीतीने खळबळ उडाली. या विचित्र ढगांची छायाचित्रे लोकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून समाजमाध्यमांवर टाकल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता.